Eknath Shinde On Pune Traffic Jam | पुण्याच्या वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान, म्हणाले…
पुणे: Eknath Shinde On Pune Traffic Jam | शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न सतावत आहे. शहरात ठिकठिकाणी विकासकामे सुरु असल्याने पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान आता या वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या (Pune Metro) टप्पा १ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील (Pune District Court To Swargate Metro) प्रवासी सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
https://www.instagram.com/p/DAiAbV7CJle
त्याचबरोबर टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन पार पडले. तसेच त्यांच्या हस्ते भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा स्मारकाचे भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचे उद्घाटन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला अर्पण करण्यात आले. या अनुषंगाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
https://www.instagram.com/p/DAgQsNZCg7H
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “पुण्याचा चहूबाजूंनी विस्तार होत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, शैक्षणिक संस्थेचे जाळे वाढत आहेत. याचा वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून प्रदूषणातही वाढ होत आहे, त्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी असून याकरीता मेट्रोसारखे प्रकल्प महत्वाचे आहेत, आगामी काळात मेट्रोचे जाळे वाढविणे काळाची गरज आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
https://www.instagram.com/p/DAgFjWaJ22x
ते पुढे म्हणाले, “राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या मदतीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. आज राज्यात विविध उद्योग येत असून उद्योगाला चालना देण्याकरीता राज्य शासन सहकार्य करीत आहेत. राज्यात ५२ टक्के परदेशी गुंतवणूक झाली आहे, विविध क्षेत्रातील उद्योजक राज्याकडे आकर्षित होऊन उद्योगाला चालना देत आहेत. आपले राज्य उद्योगस्नेही झाले असून उद्योग आणि पायाभूत सुविधेत देशात महाराष्ट्र अग्रेसर झाले आहे”, असे शिंदे यांनी म्हंटले.
https://www.instagram.com/p/DAgKiQ8JLJx
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)