FIR On IPS Bhagyashree Navtake | पुण्यात IPS भाग्यश्री नवटके यांच्यावर गुन्हा दाखल; मात्र, BHR पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणाच्या मुख्य संशयिताने शासनाकडे केलेल्या तक्रारीमध्ये 2 DCP, 1 ACP, 6 Sr PI, 2 API, 1 PSI सह इतर चौघांचा समावेश

FIR On IPS Bhagyashree Navtake |

पुणे : FIR On IPS Bhagyashree Navtake | भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील (BHR Scam Case) गैरव्यवहारप्रकरणात मुख्य संशयित असलेल्या सुनिल झंवर (Sunil Zawar) यांनी गृहखात्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्यावरुन या प्रकरणातील पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (IPS Bhagyashree Navtake) यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह खात्याच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात जळगावमधील छाप्यामध्ये (Pune Police Raid In Jalgaon) असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. BHR पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणाच्या मुख्य संशयिताने शासनाकडे केलेल्या तक्रारीमध्ये 2 DCP, 1 ACP, 6 Sr PI, 2 API, 1 PSI सह इतर चौघांचा समावेश आहे.

बीएचआर गैरव्यवहारात संगनमत करुन स्वस्तात मालमत्ता घेणे, कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी सुनिल झंवर यांना अटक करण्यात आली होती. त्यांना Supreme Court ने फेब्रुवारी २०२२ मध्ये जामीन मंजूर केला होता.

बीएचआर प्रकरणात शिक्रापूर आणि पुण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा (Pune EoW) करत होती. त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी भाग्यश्री नवटके या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगावात एकाच वेळी १० पेक्षा अधिक ठिकाणी छापे घालण्यात आले होते. या छाप्याच्या वेळी अनेक गैरबाबी करण्यात आल्याचे सुनिल झंवर व इतरांनी समोर आणले होते. त्यात छाप्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या जेवणाचे बील दुसर्‍याच व्यक्तीने दिले. छाप्यासाठी जाताना वापरलेल्या खासगी गाड्याही दुसर्‍यांच्या असल्याचे सांगण्यात आले. आपल्याला यात राजकीय कारणावरुन अडकविण्यात आल्याचा आरोप सुनिल झंवर यांनी केला होता. (FIR On IPS Bhagyashree Navtake)

याबाबत तक्रारदार सुनिल झंवर यांनी सांगितले की, आपल्याविरुद्ध खोटे एफआयआर दाखल केले.
आपल्या मुलाचा काहीही संबंध नसताना त्याला सहा महिने कोठडीत डांबून ठेवले. एका रात्रीत तीन एफआयआर दाखल केले.
खोट्या तक्रारदारांच्या नावाने तक्रारी दाखल केल्या. सरकारी नस्तीची पाने बदलली.
मला अटक करण्यासाठी रात्री १३५ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणले गेले.
अशा अनेक बाबी आपण उघड केल्या असून त्याची तक्रार गृह खात्याकडे पुराव्यानिशी केली होती.
त्यात आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके व इतर पोलीस अधिकार्‍यांची नावे दिली होती,
असे सुनिल झंवर यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान

You may have missed