Gang Rape In Bopdev Ghat Pune | बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात पोलिसांनी 450 गुन्हेगार तपासले, 40 गावे पालथी घातली; 60 तपास पथकाकडून शोधकार्य सुरु
पुणे: Gang Rape In Bopdev Ghat Pune | बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (दि.३) रात्री मित्रासह फिरायला गेलेल्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यासाठी पोलिसांनी ६० तपास पथके तयार केली आहेत. (Gang Rape In Bopdev Ghat Pune)
https://www.instagram.com/p/DA8RujVJ0yp
तसेच गेल्या पंधरा दिवसांमध्ये बोपदेव घाटमार्गे गेलेल्या सुमारे ५० हजार मोबाईल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. याशिवाय यापूर्वी शहरातील प्रमुख टेकड्या, घाट परिसरात विनयभंग, बलात्कार, दरोडा असे गंभीर गुन्हे केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/DA8XlQGJpCD
घटनास्थळापासून जवळ असलेल्या सुमारे ४० छोट्या-मोठ्या गावांमध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली आहे.
त्या गावांतील ढाबे, दारू विक्रेते, लपूनछपून अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/DA8EswHp786
पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक हॉटेलवरील सीसीटीव्ही तपासले.
मात्र, त्यामध्ये पूर्ण रस्त्यावरील परिसर दिसत नसल्याने अडचणी येत आहेत.
सासवड, राजगड पोलिसांची देखील मदत घेण्यात येत असून पोलिसांकडून आरोपींचा शोध
घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
https://www.instagram.com/p/DA8b8EAJdca
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर;
विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी
Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा
महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?
Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्या तरुणीचा मृत्यु !
कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)