Ganj Peth Pune Crime News | पुणे: अवैध धंद्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून चौघांकडून तरुणावर वार; पाय केला फ्रॅक्चर, गंजपेठेतील घटना

marhan

पुणे: Ganj Peth Pune Crime News | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर पोलिसांनी (Pune Police) अवैध धंद्यांवर कारवाईची मोहिम उघडली आहे. आपल्या अवैध धंद्याची पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयाने चौघांनी एका तरुणाला स्टीलच्या रॉडने मारहाण (Marhan) केली. त्यात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

याबाबत कृष्णा आनंद कसबे (वय २७, रा. गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी इरफान अयुबखान पठाण (वय ५६, रा. गंज पेठ), रिजवान अयुबखान पठाण (वय ५८), रिजवानची पहिली पत्नी व रिजवानची दुसरी पत्नी (सर्व रा. सार्वजनिक शौचालयासमोर, गंज पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी ८ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गंजपेठेतील सार्वजनिक शौचालयासमोर उभे होते.
यावेळी रिजवान याने त्याचे अवैध धंद्याबद्दल फिर्यादीने पोलिसांना खबर दिल्याचा संशय होता.
या कारणावरुन इरफान पठाण याने फिर्यादींना पकडले.
रिजवान व त्याच्या दोन्ही पत्नीने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली.
इरफान पठाण याने स्टीलच्या रॉडने फिर्यादीच्या उजव्या पायाच्या नडगीवर जोरात मारुन
त्यांचा पाय फ्रॅक्चर करुन जखमी केले. त्यांना बघून घेण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yerawada Pune Crime News | पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने बंदुकीतून गोळीबार करुन केले जखमी; येरवड्यातील घटना (Video)

PI Girish Sonawane | निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकरच्या 500 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ताबाबत सर्वोत्कृष्ट तपासाचे केंद्रीय गृहमंत्री दक्षता सुवर्ण पदक पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे यांना जाहीर

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात वाढतोय तरुणाईचा कल ! बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत तरुणांचा पक्ष प्रवेश

You may have missed