Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)
पुणे : Helicopter Crash In Bavdhan Pune | ऑक्सफर्ड कंटरी (Oxford Golf Course Resort Pune) येथून उड्डाण घेतलेले हेलिकॉप्टर काही मिनिटात जवळच असलेल्या बावधन येथील दरी कोसळले. या अपघातात दोन पायलट व एक इंजिनिअर अशा तिघांचा मृत्यु झाला. प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग अशी अपघातात मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.
https://www.instagram.com/p/DAm7qfbpj_K
दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे तुकडे तुकडे घटनास्थळावर पडले आहे. हे हेलिकॉप्टर दिल्ली येथील हेरिटेच एव्हिएशन कंपनीचे होते. मंगळवारी रात्री हे हेलिकॉप्टर ऑक्सफर्ड येथेच मुक्कामाला होते. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता त्याने येथून उड्डाण घेतले. काही मिनिटाच्या आतच ते जवळच्या के के कन्स्ट्रक्शन टेकडीच्या उतारावर कोसळले. कोसळत असतानाच या हेलिकॉप्टरला आग लागली. जमिनीवर कोसळल्यावर मोठा स्फोट झाला. त्याचे तुकडे सर्वत्र विखुरले गेले. या घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दल व पीएमआरडीएची ४ वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पोलीस, तहसीलदार, प्रांत अधिकारीही घटनास्थळी पोहचले. घटना घडली तेथे वाहने जाऊ शकत नव्हती. लोकांनी ओढा, नदी ओलांडून घटनास्थळी जावे लागले. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, अग्निशमन अधिकारी गजानन पाथरुडकर, शिवाजी मेमाणे यांच्यासह अनेक जवान घटनास्थळी पोहचले. तिघांचे मृतदेह ओढे नाले ओलांडून मुख्य रस्त्यावर आणण्यात आले. तेथून ते ससून रुग्णालयात रवाना करण्यात आले.
https://www.instagram.com/p/DAnBOwHJcK2
सुनिल तटकरे बचावले
खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) हे या हेलिकॉप्टरमधून मुंबईला जाणार होते.
परंतु, अचानक आपला बेत बदलून ते कारने मुंबईला रवाना झाले. धुक्क्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जाते.
तांत्रिक पथक घटनास्थळी पोहचत असून ते तपासणी केल्यानंतर हेलिकॉप्टर कोसळण्यामागील कारणाचा शोध घेणार आहे. (Helicopter Crash In Bavdhan Pune)
https://www.instagram.com/p/DAldwGhpRx7
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा