Helicopter Crash Near Paud In Pune | वेगाने खाली येत हेलिकॉप्टर कोसळले ! पौडजवळील कोंढावळेतील घटना (Video)
पुणे : Helicopter Crash Near Paud In Pune | पुणे शहरापासून ३३ किमी दूर असलेल्या मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) पौडजवळील कोंढावळे गावाजवळ विजयवाडाला जाणारे हेलिकॉप्टर कोसळले. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. हेलिकॉप्टरमधील पायलटसह चौघेही सुखरुप आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
पायलट आनंद कॅप्टन, दीर भाटिया, अमरदीप सिंग, एस पी राम अशी हेलिकॉप्टरमधील प्रवाशांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अह १३९ याने मुंबईतील जुहू येथून उड्डाण घेतले. ते विजयवाडाला जात होते. परंतु, खराब हवामानामुळे ते भरकटले. पौड जवळील कोंढावळे गावाजवळ हे हेलिकॉप्टर वेगाने खाली आले आणि शेतात कोसळले.
याबाबत गारवा वाटाणे मळाचे चालक रसिक वाटाणे यांनी सांगितले की, साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास आमच्या हॉटेलच्या मागच्या बाजूला मोठा आवाज झाला. तो ऐकून हॉटेलमधील सर्व वेटर तिकडे धावत गेलो. तेव्हा हेलिकॉप्टर कोसळलेले दिसले. चौघे जण बाहेर आले होते. त्यांच्यातील एका जण जास्त जखमी झालेला दिसत होता. त्यांना वेटरमुलांनी खाटेवर टाकून तातडीने बाहेर काढले. इतरांना चादरीवर टाकून रोडपर्यंत आणले. तेथून त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. हेलिकॉप्टरचे दोन -तीन तुकडे झाले असून पंख एका बाजूला पडले आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा