Hinjewadi Pune Crime News | 14 वर्षाच्या मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार; टेम्पोचालकाला अटक, वाल्हेकर वाडीमधील घटना

Hinjewadi Pune Crime

पिंपरी : Hinjewadi Pune Crime News | टेम्पोचालकाने एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार केला (Minor Girl Rape Case). त्यातून ही मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) या टेम्पोचालकाला अटक केली आहे.

कार्तिक ऊर्फ मंगेश कांबळे Kartik alias Mangesh Kamble (वय २३, रा. ढमाले वस्ती, कासारसाई) असे त्याचे नाव आहे. याबाबत या मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कासारसाई, चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे एप्रिल २०२४ ते जून २०२४ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना कांबळे याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. याबाबत कोणास काही सांगितले तर तुला तुझ्या घरच्यांना जीवे मारुन टाकीन व आपल्या दोघात जे झाले आहे ते मी तुझ्या मित्र मैत्रिणींना सांगून तु फालतु आहेस, अशी बदनामी करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरुन या मुलीने कोणाला हा प्रकार सांगितला नाही.
त्यामुळे त्याने वारंवार यामुलीला घेऊन जाऊन टेम्पोमध्ये तिच्यावर बलात्कार केला.
त्यात ही मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला.
पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक तुकाराम शेळके (PSI Tukaram Shelke) तपास करीत आहेत. (Hinjewadi Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”, शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या

You may have missed