IPS Pravinkumar Patil | गणेशोत्सव चांगला करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांचा पुढाकार हवा; प्रवीणकुमार पाटील यांचे आवाहन (Video)
पुणे : IPS Pravinkumar Patil | पुण्यातील आपला गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) अधिक चांगला करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. निर्णय तुम्ही कार्यकर्त्यांनी घ्यावयाचा आहे. तुमच्या सकारात्मक सुचनांवर संवाद साधत मार्ग काढण्यासाठी पोलीस सदैव तुमच्या सोबत आहेत, असे आश्वासन अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम) प्रवीणकुमार पाटील यांनी दिले. मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांना साथ देण्याची तयारी दर्शविली.
https://www.instagram.com/reel/C_f1Pmzp7k5/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
‘युवकांच्या मनातील गणेशोत्सव’ असा आगळावेगळा कार्यक्रम मंगळवारी (ता. 03 सप्टेंबर 2024) रात्री झाला. शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमधील मंडळांच्या तरुण कार्यकर्त्यांनी सदाशिव पेठेतील फडके सभागृह खचाखच भरले होते.
कार्यकर्त्यांनीच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित होता. गणेश मंडळाचे कार्यकर्ते राघवेंद्र ऊर्फ बाप्पू मानकर (Raghvendra Alias Bapu Mankar) यांनी पुढाकार घेत तरुण कार्यकर्त्यांना प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी पहिल्यांदाच हे नवीन व्यासपीठ निर्माण केले आहे.
मी तुमचे ऐकण्यासाठी आलो असून, उत्सवातील अडचणी सांगतानाच त्यातून मार्ग काढण्यासाठी सकारात्मक सुचना करण्याचे आवाहन प्रवीणकुमार पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असंख्य कार्यकर्त्यांनी उत्सवात मंडळासमोर येणाऱ्या अडचणी मांडल्या. उपयुक्त सुचना केल्या. विविध उपाय सुचवितानाच कार्यकर्ते कशा पद्धतीने सहकार्य करू शकतील, याबाबतही त्यांची मते व्यक्त केली.
गणेशोत्सवात होणारी वाहतुकीची कोंडी, विसर्जन मिरवणुकीत अन्य तीन मार्गांवर अधिक पोलीस बंदोबस्ताची अपेक्षा, मंडळांना मार्ग करून देण्यासाठी पोलिसांचे सहकार्य अशा विविध मुद्यांवर कार्यकर्त्यांनी सुचना केल्या. महिलांसाठी स्वच्छ्ता गृह उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
प्रवीणकुमार पाटील म्हणाले, “कार्यकर्ते हेही पोलीसच आहेत. त्यांनी मंडळाचा परिसर आणि लगतच्या चौकात वाहतुक नियंत्रणाची जबाबदारी घ्यावी. पोलीस अधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे त्याचे नियोजन करावे. विसर्जन मिरवणुकीत टिळक रस्त्यावरून जाणाऱ्या मंडळांची बैठक घेणार आहोत. केळकर रस्ता आणि कुमठेकर रस्त्यांवरून जाणाऱ्या मंडळांशीही चर्चा करू. शाळांच्या मैदानात पार्किंगची सुविधा देण्याबाबत चर्चा करीत आहोत.”
ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले, “लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. या उत्सवाची जबाबदारी आता तुम्हा युवा कार्यकर्त्यांवर आहे. त्यात सुधारणा करीत गणेशोत्सव अधिक चांगला करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू.”
राघवेंद्र मानकर म्हणाले, “कोरोना साथीच्या काळात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना मदत करीत माणुसकी जपण्याचे, सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले.
त्यामुळे लोकभावना सकारात्मक झाली. युवा कार्यकर्त्यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा,
यासाठी पहिल्यांदाच हे नवे व्यासपीठ आपण ‘युवकांच्या मनातील गणेशोत्सव’ या नावाने सुरू केले.
याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने, दरवर्षी अशी बैठक आपण घेऊ.”
विश्रामबागच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार (PI Vijaymala Pawar) म्हणाल्या की गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागातील अडचणी सांगाव्यात.
त्यांच्याशी चर्चा करून या अडचणी दूर करण्यासाठी आपण एकत्रितरित्या प्रयत्न करू.
या भागातील वाहतूक सुरळीत ठेवतानाच गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे.
श्री गणेश ही आपली आराध्य देवता असून त्याचे पावित्र्य, मांगल्य जपण्यासाठी आपण सर्वजण काम करू.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Gultekdi Pune Crime News | पुणे : गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन;
भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, 5 जणांना अटक