Jaydeep Apte Arrest | शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक; जयदीप कसा पकडला गेला जाणून घ्या

Jaydeep Apte Arrest

सिंधुदुर्ग : Jaydeep Apte Arrest | राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर (Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed) फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. राजकोट गडावरील शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेचा शोध सुरु होता. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर जयदीप आपटे आपल्या राहत्या घरातून पळून गेला होता.

https://www.instagram.com/p/C_hcazQpoEE

सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात (Sindhudurg Police Station) जयदीप याच्या विरोधात गुन्हा दाखल होताच सिंधुदुर्ग पोलीस, सिंधुदुर्ग गुन्हे शाखा, कल्याण गुन्हे शाखा, ठाणे गुन्हे शाखा, कल्याण स्थानिक पोलीस यांचे पथक जयदीप याचा शोध घेत होते. जयदीप त्यांच्या कुटुंबियांना भेटायला येणार असल्याची माहिती कल्याण पोलिसांना मिळाली होती.

जयदीप आपटे हा कल्याण येथे राहणारा आहे. घटना घडली त्याच दिवशी जयदीप हा घरातून निघून गेला होता. तर त्याची पत्नी व इतर कुटुंब हे सायंकाळी घराला कुलूप लावून शहापूर येथे निघून गेले. कल्याण गुन्हे शाखेने शहापूर येथे जाऊन त्याची पत्नी व आईला चार पाच दिवसांपूर्वी कल्याण येथे त्यांच्या राहत्या घरी परत आणले. त्यांच्यावर पोलिसांचे लक्ष होते. जयदीप हा कुटुंबाला भेटण्यासाठी नक्की येणार याची खात्री पोलिसांना होती.

जयदीप याच्या घराखाली पोलिसांची दोन पथके तैनात होती. पोलिसांनी त्याची पत्नी निशिगंधा आपटे यांची पुन्हा चौकशी केली. त्यात पोलिसांना जयदीप बुधवारी कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. कुटुंबीयांच्या भेटीसाठी जयदीप आपटे बुधवारी (दि.४) रात्री कल्याण येथील घरी निघाला.

कसारा येथे लोकल पकडून तो कल्याण स्टेशनला उतरला. रेल्वे स्थानकातून कल्याण मधील दूधनाका परिसरात तो पोहोचला. तोंडावर मास्क आणि डोक्यावर टोपी घालून तो घराजवळ आला. यावेळी राहत्या घरी जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी जयदीपला हटकलं आणि त्याच्याकडे ओळखपत्र मागितले.

एकूण वर्णनावरुन पोलिसांना तो जयदीप आपटे असल्याची खात्री झाली.
पोलिसांनी त्याच्यावर आवाज चढवताच जयदीप घाबरला. त्यानंतर तो आपल्याला सोडण्यासाठी विनवणी करु लागला.
इतक्यात बघ्यांची गर्दी जमा झाली. गर्दी आणि आवाजामुळे जयदीपला भेटण्यासाठी आई आणि पत्नी इमारतीच्या खाली आल्या.
परंतु पोलिसांनी जयदीपला घरी जाऊ दिले नाही, त्याऐवजी डीसीबी स्क्वॉड कडे नेण्यात आले.
त्यानंतर जयदीपला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अवघ्या आठ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळल्याने संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात होता.
या प्रकरणात मालवण बंदही करण्यात आले. तसेच विरोधी पक्षांनी मुंबईत सरकारला जोडे मारो आंदोलन देखील केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)
यांनी या संपूर्ण प्रकरणात माफी देखील मागितली होती. तसेच या प्रकरणाचे राजकारण करु नये, असे आवाहनही करण्यात आले होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gultekdi Pune Crime News | पुणे : गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन;
भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, 5 जणांना अटक

Pune Crime News | सुधीर गवस खुनाचा बदला घेण्यासाठी खूनाचा प्रयत्न करुन फरार झालेला गुंड जेरबंद (Video)

You may have missed