Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | रक्त बदलणारा अरुणकुमार याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण

Swapping-Teens-Blood-Sample

पुणे : Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | अल्पवयीन मुलासोबत पोर्शे कारमध्ये मद्याच्या अमलाखाली असलेल्या त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्याप्रकरणात (Blood Sample Tampering Case Pune) फरारी असलेल्या अरुणकुमार सिंग (Arun Kumar Singh) याने अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

अरुणकुमार देवनाथ सिंग (वय ४७, रा. विमाननगर) असे या आरोपीचे नाव आहे. कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघातात संगणक अभियंते असलेल्या तरुणतरुणीचा मृत्यु झाला होता. कारचालक अल्पवयीन मुलाचे दोन मित्रांनी देखील मद्यपान केले होते. त्यांना वाचविण्यासाठी स्वत:चे रक्त या मुलांचे रक्त म्हणून दोघांनी दिले होते.

आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. सोपान सोसायटी, बी टी कवडे रोड, घोरपडी) आणि आशिष सतीश मित्तल (वय ३९, रा. स्काय वेलवेडर सोसायटी, विमाननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांना न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़ आदित्य सूद याने आपल्या मुलाऐवजी स्वत:चे रक्त दिले तर, अरुणकुमार सिंग याच्या मुलाचे म्हणून आशिष मित्तल याने रक्त दिले होते. अरुणकुमार सिंग याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. न्यायालयाने अद्याप त्यावर निर्णय दिला नाही. (Kalyani Nagar Porsche Car Accident Pune)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”,
शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या