Katraj Kondhwa Road Pune Crime News | मध्यस्थी केल्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; कात्रज-कोंढवा रोडवरील घटना

koyta

पुणे : Katraj Kondhwa Road Pune Crime News | वडिलांना धमकी दिल्याने मध्यस्थी केल्याने मुलावर दारुड्याने कोयत्याने वार (Koyta Attack) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या साथीदाराने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. या घटनेत विद्याधर नायर हा गंभीर जखमी झाला आहे.

https://www.instagram.com/p/DAX0OpPp66a

याबाबत महेश सुभाष त्र्यंबके (वय २५, रा. शिवशंभो नगर, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमित शेख, अक्षय गायकवाड, किरण माने व त्यांच्या एक साथीदार अशा चौघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रज कोंढवा रोडवरील जयशंकर टायर्स येथे २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते पावणे नऊ दरम्यान घडली.

https://www.instagram.com/p/DAXyHB-pGwI

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे गॅरेज आहे. तेथे टायर पंक्चर काढण्याचे काम विद्याधर नायर करतात़ अमित शेख हा दारु पिऊन गॅरेजवर आला होता. त्याने विद्याधर नायर यांच्या वडिलांना धमकी दिली. तेव्हा विद्याधर याने मध्यस्थी करुन त्याला समजावून पाठवून दिले होते. त्याचा राग मनात धरुन अमित गायकवाड हा इतर साथीदारांना घेऊन आला. अमित शेख याने विद्याधर याला “तुला खल्लास करतो,” असे म्हणून त्यांच्या डोक्यावर, डाव्या हातावर, बरगडीवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. त्यांच्या साथीदारांनी “हा पण होता साला संपवून टाकु” असे म्हणून फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच विद्याधर याच्या वडिलांना अक्षय व किरण यांनी लोखंडी रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेडे (API Sameer Shende) तपास करीत आहेत. (Katraj Kondhwa Road Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAXwbm4CDuZ

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’