Katraj Pune Crime News | विप्रो कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक; पतीपत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : Katraj Pune Crime News | विप्रो कंपनीत (Wipro Conpany) नोकरी लावतो, असे आमिष दाखवून (Lure Of Job) धैयपूर्ती फायनान्स फंडामध्ये पैसे गुंतविण्यास भाग पाडून काही जणांची तब्बल २१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) पतीपत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Cheating Fraud Case)
https://www.instagram.com/p/DA7mV1zJcoU
सुनिल किर्दक आणि प्रतिभा सुनिल किर्दक (रा. बलकवडेनगर, नारायण चेंबर्स कात्रज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अर्चना आबासाहेब साळुंके (वय ४३, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रजमधील नारायण चेंबर्स येथे २०१९ पासून २०२२ दरम्यान घडला.
https://www.instagram.com/p/DA7phM_C0_T
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना विप्रो कंपनीमध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार रुपये घेतले. धैयपूर्ती फायनान्स फंडामध्ये फिर्यादीची भावजय, फिर्यादीचे पती व त्यांची दोन मित्र मधुकर धनावडे व संजय शिंदे यांना प्रति महिना प्रती सभासदत्व अन्वये २५ हजार रुपये प्रमाणे ६ महिन्यांमध्ये ७ लाख ५० हजार रुपये असे मिळून १४ लाख रुपये भरले. फिर्यादी यांना विप्रो कंपनीत नोकरी लावली नाही. वारंवार पैसे परत मागितले असता ते न देता १४ लाख रुपयांची फसवणूक केली.
तसेच कल्पना फरड यांनाही विप्रो कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यांना धैयपूर्ती फायनान्समध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडून त्यांची ७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी (PSI Ratikant Koli) तपास करीत आहेत. (Katraj Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DA7urODi2oM
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण