Katraj Pune Crime News | पुणे: अनैतिक संबंधातील अडसर दूर करण्यासाठी पतीचा गळा दाबून खून ! प्रियकरासह पत्नीला अटक, कात्रजमधील घटना

Murder

पुणे : Katraj Pune Crime News | दरोड्याचा बनाव करुन पतीला प्रियकरांमार्फत पतीचा खून करण्याचा प्रकार वारजे (Warje Malwadi) येथे घडला असतानाच असाच प्रकारे पतीचा गळा दाबून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार कात्रजमध्ये घडल्याचे समोर आले आहे. (Murder Due To Immoral Relationship)

https://www.instagram.com/p/DAXjsR2zQli

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) प्रियकर व पत्नीला अटक केली आहे. राणी गोपीनाथ इंगुळकर (वय ३२, रा. दुगड शाळेजवळ, कात्रज) आणि नितिन शंकर ठाकर (वय ४५, रा. कुरण, ता. वेल्हा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोपीनाथ बाळु इंगुळकर (वय ३७, रा. दुगड शाळेजवळ, सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्यांचे नाव आहे.

https://www.instagram.com/p/DAXleTqJepX

याबाबत त्यांचा भाऊ संभाजी बाळु इंगुळकर (वय ४४, रा. वृंदावन कॉलनी, संतोषनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ इंगुळकर हे मार्केटयार्डात हमाली करत होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. २३ सप्टेबर रोजी ते घरात मृतावस्थेत आढळून आले होते. याबाबत त्यांची पत्नी राणी इंगुळकर यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गोपीनाथ हे मधुमेहाच्या त्रासाला कंटाळले होते.

https://www.instagram.com/p/DAXn2EnJlCI

आपल्याला जीवंत रहायचे नाही़ माझा गळा दाब असे ते सांगत असत. मला गळा दाबायला लावत असे. त्यांनी स्वत:च गळा दाबून घेऊन आत्महत्या केली, असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद करुन मृतदेह शवविच्छेदनाला पाठविला. शवविच्छेदनात गळा दाबून मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच कोणीही स्वत:चा गळा स्वत: दाबून घेऊन मृत्यु होऊ शकत नाही, असे सांगितले. त्यांचा नातेवाईक नितीन ठाकर यांच्याशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा राणी इंगुळकर हिच्याकडे चौकशी सुरु केली. तेव्हा तिने आपणच नितीन ठकार याच्या बरोबरच्या संबंधनाना अडसर होत असल्याचे रविवारी रात्री पतीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील (Sr PI Dashrath Patil) यांनी दिली़. सहायक पोलीस निरीक्षक दोडमिसे तपास करत आहेत. (Katraj Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAWIGC6C0UN/?img_index=1

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी कात्रज आणि इतर परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून संघर्ष पेटला! शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरीचा इशारा

Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”