Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत

marhan

पुणे: Katraj Pune Crime News | कात्रज येथील सुंदरनगर परिसरात गुंडांनी तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून दहशत माजविली. याबाबत सुमित मारुती पंडित (वय २७, रा. स्वामी समर्थ सदन, सुंदरनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश् माळवे, यश घोडके व त्यांचा मित्र यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सुंदरनगरमध्ये मंगळवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. (Katraj Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ किरण आणि मित्र स्वप्निल हे रिक्षात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी अचानकपणे एका दुचाकीवरुन त्यांच्या तोड ओळखीचे गणेश माळवे, यश घोडके व त्यांचा मित्र असे ट्रिपल सीट आले. तिघेही नशेमध्ये होते. त्यापैकी एकाने फिर्यादीने रोहित रणदिवे कोण आहे, त्याला ओळखतो का असे विचारुन शिवीगाळ केली. या तिघांपैकी दोघांचे हातात लोखंडी कोयते होते.

त्यांनी फिर्यादीला मारहाण करुन जखमी केले. तेथे पार्क केलेल्या रिक्षा,
चारचाकी गाड्या फोडू लागले. तेव्हा त्याना तुम्ही गाड्या का फोडता असे विचारल्यावर त्यांनी
शिवीगाळ करुन हत्याराने मारहाण करण्याची भिती दाखविली.
तेथून जवळच राहणार्‍या किशोर कुचेकर, मल्लिनाथ मळवडे यांनाही त्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी वृंदावन सोसायटी येथील रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या पाच ते सहा गाड्यांच्या काचा फोडल्या. टोळक्याने हत्यार हवेत फिरवून दहशत माजवली. सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा