Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून गंगाधाम रोडवर फायरिंग; रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा करायचा होता गेम, दुसर्‍यालाच लागली गोळी

Pune Crime News | 17-year-old boy injured after being shot while playing with pistol

पुणे : Pune Crime News |  गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारामधील पूर्व वैमनस्यातून गुन्हेगाराचा गेम करायचा होता, परंतु गोळी दुसर्‍यालाच लागल्याचा प्रकार समोर आला आहे. मार्केटयार्डमधील वखार महामंडळाकडून गंगाधामकडे जाणार्‍या रोडवर रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली.

मोझेस शेकापूरे ऊर्फ मोज्या (वय २२, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्या पाठीत गोळी शिरली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

मिनाताई ठाकरे वसाहतीत बालाजी उमाप, राम उमाप व त्याच्या साथीदारांची व शेकापूरे टोळीमध्ये वर्चस्ववादातून यापूर्वी अनेकदा वाद झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलांनी हवेत गोळीबार केला होता. यावरुन बालाजी उमाप आणि अमित शेकापूरे यांच्यामध्ये शुक्रवारी दुपारी वादावादी झाली होती. त्यानंतर अमित शेकापूरे याचा भाऊ मोझेस शेकापूरे व त्याचा मित्र हे दुचाकीवरुन शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता वखार महामंडळाकडून गंगाधामकडे जात होते. यावेळी बालाजी उमाप, राम उमाप व त्याचे ४ ते ५ साथीदार दुचाकीवरुन आले. त्यांनी शेकापूरे व त्याच्या मित्राला अडविले. या वेळी उमाप याने गोळीबार केला. ती गोळी शेकापूरे याच्या पाठीत शिरली.  तो जागेवरच कोसळला. हे पाहिल्यावर हल्लेखोर पळून गेले.  मार्केटयार्ड पोलिसांना शेकापूरे याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

हल्लेखोरांना शेकापूरे नाही तर त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला मारायचे होते, मात्र, गोळीबारात शेकापूरे हा जखमी झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप तपास करीत आहेत.

You may have missed