Khed Pune Crime News | 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
खेड : Khed Pune Crime News | १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर विनयभंग (Molestation Case) व पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक बाळासाहेब दौंडकर Hrithik Balasaheb Daundkar (वय १९) व निखील दत्तात्रय दौंडकर Nikhil Dattatraya Daundkar
(वय १९) दोघे रा. दौंडकरवाडी, ता. खेड) अशी आरोपींची नावे आहे.
याबाबत खेड पोलिसांनी (Khed Police) दिलेल्या माहितीनुसार, पिडित अल्पवयीन मुलीला दि २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ऋतिक दौंडकर याने फोन करून तु माझ्या सोबत चल तु जर आली नाही तर तुला जिवे ठार मारेल अशी धमकी देऊन घराबाहेर बोलावुन घेतले.
मोटार सायकलवर बसवून दावडी परिसरातील फॉरेस्टच्या जागेत नेले. मुलीसोबत जबरदस्तीने शारिरिक सबंध करण्यासाठी तिचे कपडे बळजबरीने काढुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
निखील दौंडकर याने या प्रकाराला मदत केली. मुलगी घरात नाही हे कुटुंबाला समजल्यावर शोध घेतला.
पहाटे ४ वाजताच्या सुमारास घरापासुन काही अंतरावर माळावर गेले असता कुटुंबिय आलेचे पाहुन ऋतिक दौंडकर व
निखील दौंडकर यांनी पीडित मुलीस मोटार सायकलवरून खाली ढकलुन दिले. यामध्ये पीडित मुलगी जखमी झाली.
या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल गुरव करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून