Kothrud Pune News | कोथरूडमध्ये महा कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन ! पाच हजार पेक्षा जास्त मुलींचे होणार पूजन, चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

Chandrakant Patil

पुणे : Kothrud Pune News | नवरात्रोत्सव काळात कन्यापूजनाचे वेगळे महत्त्व असून, नामदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये महा कन्या पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या अद्भूत सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात नामदार पाटील यांनी केले आहे.

https://www.instagram.com/p/DA5QnnqJtiH

धार्मिक श्रद्धांनुसार,नवरात्रोत्सव काळातील नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते. या उपासनेने दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. यासोबतच कन्यापूजना शिवाय नवरात्रीची उपासना यशस्वी होऊ शकत नाही, अशी देखील धारणा आहे.

https://www.instagram.com/p/DA5T-bap9Lv

त्यामुळे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आणि उत्सवाच्या निमित्ताने उपासनेचे फळ सर्वांना लाभावे यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील हे देखील सात मुलींचे पूजन करणार आहेत. मंत्रोच्चाराच्या घोषात, आध्यात्मिक वातावरणात दिनांक ११ ऑक्टोबर रोजी कोथरुड मधील शुभारंभ लॉन्स येथे सायंकाळी ४.३० ते ७ वेळेत हा नयनरम्य सोहळा संपन्न होणार आहे.

https://www.instagram.com/p/DA5SKXCJOeF

शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणार्‍या मातांची रूपे वेगवेगळी आहेत. लहान मुलींमध्ये ही रूपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरूप असते. तिच्या जन्माने प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी आणि भरभराट होते. नवरात्रोत्सव काळात तिची पूजा म्हणजे साक्षात, आदिमायेची पूजा करणे आहे. मागील पाच वर्षांत कोथरुड मधील मुलींचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून हजारो मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासोबतच मानसी सारख्या उपक्रमातून वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोथरूड मध्ये आयोजित महा कन्यापूजन सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नामदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

https://www.instagram.com/p/DA5dAbviU_i

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed