Koyta Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करून पसार झालेले सराइत अटकेत

Koyta Attack On Police Officer

पुणे : Koyta Attack On Police Officer In Pune | हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात भांडण सोडविणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने वार करुन पसार झालेल्या सराइतांना सोलापूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय 19, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय 20, रा. हडपसर), अमरसिंग जग्गरसिंग टाक (23) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

हडपसर भागातील ससाणेनगर (Sasane Nagar Hadapsar) परिसरात रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू होते. त्या वेळी एका दुचाकीस्वाराच्या बाजूने आरोपी निहालसिंग आणि राहुलसिंग भांडण करत होते. आरोपींच्या हातात कोयता होता. त्या वेळी तेथून निघालेले सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी आरोपींना पाहिले. गायकवाड यांनी भांडणात मध्यस्थी करून आरोपी निहालसिंग टाक याच्या हातातील कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला. झटापटीत टाकने कोयता फेकून मारल्याने गायकवाड यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर टाक आणि साथीदार भोंड हे तेथून पसार झाले. (Koyta Attack On Police Officer In Pune)

पोलीस उपायुक्त आर.राजा (DCP Raja) यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी सहायक निरीक्षक गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पसार झालेल्या सराइतांना पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी (Solapur Rural Police) आरोपींना पकडून पुण्याच्या गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या ताब्यात दिले. (Pune Crime Branch)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed