Lalit Patil Drug Case Pune | ललित पाटील प्रकरणात 5 हजार कोटींचे ड्रग्स पकडणार्या गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे आणि त्यांच्या पथकाला 25 लाखांचे बक्षीस जाहीर
पुणे : Lalit Patil Drug Case Pune | ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) पुण्यासह दौंडजवळील कुरकुंभ, सांगली जिल्ह्यातील कुपवाड, दिल्ली, बिहारमधील पटना, पश्चिम बंगाल येथे कारवाईवरुन तब्बल ५ हजार कोटींहून अधिक रक्कमेचा मेफेड्रॉनचा साठा जप्त केला होता. नाशिक जिल्ह्यातील कारखान्यावरही कारवाई केली होती. ही कारवाई करणार्या गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) व त्यांच्या पथकाला राज्य शासनाने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे़. तशी अधिसुचना शासनाने जारी केली आहे. (Pune Crime Branch)
https://www.instagram.com/p/DA-NipwJAV9
ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल असताना तेथून ललित पाटील हा आपला ड्रग्सचा व्यवसाय चालवित असल्याचे एका छाप्यानंतर उघडकीस आले. त्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ललित पाटील पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमधून पळून गेला होता. त्यामुळे या प्रकरणाची देशभर चर्चा झाली. त्याचा परिणात पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने त्याची पाळेमुळे खणून काढताना अगदी दिल्ली, पश्चिम बंगाल, पाटणा येथे जाऊन मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त केला होता. या पथकाला शासनाने २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हा निधी पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्त यांना वितरीत करावा आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी कारवाईबाबत कामगिरची नोंद घेऊन ही रक्कम पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना देण्यात यावी, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/DA-KmqUiJzg
गुन्हे शाखेत त्या वेळी सहायक पोलीस आयुक्त म्हणून सतीश गोवेकर आणि सुनील तांबे हे कार्यरत होते. आता सतीश गोवेकर हे सेवानिवृत्त झाले आहेत तर सुनील तांबे हे विशेष शाखेत कार्यरत आहेत.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण