Loni Kalbhor Pune Crime News | लोणी काळभोर : रिक्षाचालकाला तिघांनी केली बेदम मारहाण

marhan

पुणे : Loni Kalbhor Pune Crime News | रिक्षाने घरी जात असताना वाटेत तिघांनी आडवून विजय कांबळे याच्याविरुद्ध तक्रारी करुन पाठपुरावा करतोस ते थांबव, नाही तुझे काही खरे नाही, असे म्हणून रिक्षाचालकाला लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने बेदम मारहाण (Bedum Marhan) करुन जबर जखमी केले. (Attack On Auto Driver)

https://www.instagram.com/p/DA8XlQGJpCD

याबाबत तुकाराम अर्जुन लांडगे (वय ४६, रा. काकडे मळा, थेऊर) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे (Loni Kalbhor Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अ‍ॅक्टीवावरील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी सायंकाळी सहा वाजता थेऊर रेल्वे पुलानंतर काकडे मळा कडे जाणार्‍या रोडवर घडला.

https://www.instagram.com/p/DA8RujVJ0yp

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. ते रिक्षा घेऊन काकडे मळा येथील घरी जात होते. थेऊर येथील रेल्वे पुल ओलांडल्यावर काकडे मळाकडे जाणार्‍या रस्त्यावर त्यांनी युटर्न घेतल्यानंतर दोन अ‍ॅक्टीवावरुन तिघे जण आले. त्यांनी रिक्षासमोर आपल्या गाड्या थांबविल्या.

त्यामुळे लांडगे यांना रिक्षा थांबवावी लागली. त्यांनी लांडगे यांना रिक्षामधून बाहेर ओढले. दोघांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या दोन्ही पायाचे नडगीवर, पोटरीवर मारुन जखमी केले. त्यांच्यातील एक जण म्हणाला, विजय जानबा कांबळे याच्याविरुद्ध तक्रारी करुन पाठपुरावा करतोस, ते थांबव़ नाही तर तुझे काही खरे नाही, असे म्हणून फिर्यादीला पुन्हा लाथाबुक्यांने व दांडक्याने मारहाण केली. फिर्यादी यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल. तेव्हा त्यांच्यातील एकाने मिरची पावडरचा स्प्रे त्यांच्या डोळयावर मारला. त्यामुळे त्यांना कमी दिसु लागले. त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवीगाळ करुन फिर्यादीचे दोन्ही पायाचे नडगीवर पोटरीवर मारुन जखमी करुन पळून गेले. पोलीस हवालदार व्ही एन जाधव तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DA8EswHp786

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed