Lonikand Pune Crime News | पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीच्या प्रियकाराने दिली होती धमकी
पुणे : Lonikand Pune Crime News | पत्नी विवाहबाह्य संबंध सोडायला तयार नाही, प्रियकराने जीवे मारण्याची दिलेली धमकी, याला कंटाळून पतीने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली. (Suicide Case)
सोपान धोंडिराम केंद्रे (वय ३३, रा. विठ्ठलवाडी, लोणीकंद, मुळ रा. नांदेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची आई रंभाबाई धोंडिराम केंद्रे (वय ६५, रा़ चैतन्यनगर, नांदेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोपानची पत्नी भाग्यश्री आणि तिचा प्रियकर मधुकर अंबाजी केंद्रे (वय ३५, रा. मु. पो. अंबुलगा, सेल्लाळी, ता. कंधार, जि. नांदेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ एप्रिल २०२४ रोजी लोणीकंदमध्ये घडला होता. (Lonikand Police Station)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा सोपान व भाग्यश्री यांचे लग्न २०१६ मध्ये झाले होते. लग्नानंतरही सून भाग्यश्री हिचे मधुकर केंद्रे याच्याबरोबर विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. सोपान हा तिला लग्नाबाहेरील संबंध सोडण्याबाबत वारंवार सांगायचा प्रयत्न करायचा. परंतु, ती त्यास तयार नव्हती. मधुकर केंद्रे याने सोपान याला तू भाग्यश्रीला सोडून दे, मी तिला संभाळतो़ तू आमच्यामध्ये येऊ नको, नाय तर तुला सोडणार नाही़ अशी धमकी दिली होती. त्यामुळे मधुकर केंद्रे व पत्नी यांच्याकडून होणार्या त्रासाला कंटाळून सोपान केंद्रे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत. (Lonikand Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून