Lonikand Pune Crime News | पुणे : अनैतिक संबंधातून आईने प्रियकराच्या मदतीने केला मुलाचा खून

Murder

पुणे : Lonikand Pune Crime News | अनैतिक संबंधात मुलाचा अडथळा होत असल्याने प्रियकराच्या मदतीने आईनेच मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनिल लालसिंग ठाकुर (वय ३०, रा. वाघमारे वस्ती, पेरणेफाटा, पेरणेगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) सुमित्रा लालसिंग ठाकुर (वय ५५, रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा)हिला अटक केली आहे़ तर तिचा प्रियकर प्रफुल पुंडलिक ताथोड (वय ३५) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Murder Due To Immoral Relationship)

https://www.instagram.com/p/DA-uZBmp94F

याबाबत अनिल याचा भाऊ सुनिल लालसिंग ठाकुर (वय ३२, रा. पेरणेफाटा) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकार लोणीकंद येथील तळेराण वस्ती येथील खडी मशीनजवळील मोकळ्या जागेत गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.

https://www.instagram.com/p/DA-hDyKC-xq

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल ठाकूर हा काही कामधंदा करत नसे. त्याला दारुचे व्यसन होते. अनिलची आई सुमित्रा हिचे त्यांच्याच परिसरात राहणारा आरोपी प्रफुल सोबत अनैतिक संबंध होते. याची अनिलला कुणकुण लागल्याने त्यांच्यात भांडणे होत होती. गुरुवारी मध्यरात्री त्यांच्यात भांडणे झाली. त्यात सुमित्रा हिने प्रफुल याच्या मदतीने अनिल च्या डोक्यात दगड घातला. त्यात त्याचा मृत्यु झाला. अनिल याचा मृत्यु झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाली. ते सर्व जण गुरुवारी त्यांच्या घरी जमले होते. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांपैकी एकाने सुमित्रा ठाकुर हिच्या अनैतिक संबंधाची माहिती पोलिसांना फोन करुन कळविली. पोलिसांनी सुमित्रा हिच्याकडे चौकशी केल्यावर तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केली असून प्रफुल ताथोड याचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितेश घोरपडे (API Nitesh Ghorpade) तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DA-duNOJ1ua

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed