Madha Assembly Constituency | माढा विधानसभा मतदारसंघातून चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला; बबन शिंदेंची मोर्चेबांधणी मोडून काढण्याचा प्रयत्न; शरद पवार म्हणाले…

मुंबई: Madha Assembly Constituency | माढा विधानसभा मतदारसंघावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Sharad Pawar NCP) रस्सीखेच सुरु आहे. माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार बबन शिंदे (Baban Shinde) यांनी यंदा निवडणुकीतून माघार घेत मुलगा रणजित शिंदेला (Ranjit Shinde) पुढं करून तुतारी (Tutari) वर लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याबाबत ते शरद पवारांची सातत्याने भेट घेत आहेत.
मात्र शिंदे यांच्याकडून मुलासाठी सुरू असलेली मोर्चेबांधणी मोडून काढण्यासाठी माढ्यातील इतर चार इच्छुकांनी आज शरद पवार यांची मुंबईत भेट घेत आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, मात्र पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना दूर ठेवा, अशी भूमिका घेतली आहे.
तुतारी चिन्हावर उमेदवारी मागण्यासाठी आज (दि.१९) अभिजीत पाटील यांच्यासह संजय कोकाटे, नितीन कापसे, संजय घाटनेकर पाटील अशा चौघांनी शरद पवारांची भेट घेतली. “आम्ही सर्व इच्छुक भेटल्यानंतर रणजीत शिंदे यांना आपण उमेदवारी देणार नसल्याचे शरद पवारांनी आम्हाला आश्वस्त केले आहे,” अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हे काल (दि.१८) शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या परिसरात आले होते. मात्र तिथे माध्यमांचे कॅमेरा पाहताच कारमध्ये मास्क घालून बसलेल्या रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी माध्यमांची नजर चुकवण्याचा प्रयत्न करत चालकाला तिथून गाडी काढण्यास सांगितले आणि ते निघून गेले. रणजीतसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीवरून प्रश्न विचारल्यानंतर अभिजीत पाटील म्हणाले, “आमची सातत्याने धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी चर्चा होत आहे. मात्र त्यांच्या कुटुंबातील कोणीही अद्याप विधानसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवलेली नाही”, असे त्यांनी म्हंटले आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?