Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने घरात शिरुन सामानांची तोडफोड करत केले नुकसान, तरुण, आईवडिलांना लाथाबुक्क्यांनी केली मारहाण, कोथरुड पोलिसांनी 5 जणांना केली अटक

Pune Crime News | Thugs run amok due to lack of police action following the registration of a case over an assault; a gang brutally beat up two youths after they questioned the earlier assault on a girl.

पुणे : Pune Crime News | वस्तीमध्ये का फिरता, या कारणावरुन झालेल्या वादानंतर टोळक्याने घरात शिरुन सामानाची तोडफोड केली. तरुणासह त्याच्या  आईवडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी करत दहशत माजविली. कोथरुड पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल करुन ५ जणांना अटक केली आहे. त्यातील मुख्य आरोपी सुरज कदम याचे नावच आरोपीमध्ये घेतले नसल्याचे सांगितले जात आहे.

https://www.instagram.com/p/DWG6JLciQ8w

याबाबत राहुल सुभाष गायकवाड (वय २२, रा. गणजय सोसायटी, श्रावणधारा वसाहत, शिवतारा गार्डनजवळ, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यावरुन तेजस कांबळे, अजय महाजन, निरज सातपुते, नदिम शेख, अभिजित ओव्हाळ, सनी सानक्य आणि अभि घारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गायकवाड हे त्यांचे मित्र हर्ष सिताराम नाईक, अक्षय संजय मण्यारे, ऋतुराज सिताराम नाईक, ऋषीकेश अनिल शिंदे, कृष्णा हनुमान ढेमे हे सर्व १५ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता श्रावणधारा वसाहतीत जात होते. त्यावेळी तेजस कांबळे, अभि घारे, उमेश चव्हाण, सनि असे सर्व जण विठ्ठल मंदिरासमोर बसले होते. त्यामधील तेजस कांबळे याने आवाज देऊन बोलवुन घेतले व तेजस कांबळे याने तुम्ही वस्तीत का फिरता असे बोलल्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. वस्तीतील लोकांच्या मदतीने हा वाट मिटलेला होता.

१९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता फिर्यादी राहुल हे वडिल सुभाष सोपान गायकवाड, आई शांताबाई गायकवाड, भाऊ अविनाश गायकवाड, वहिनी मधु गायकवाड घरी जेवण करत असताना जुन्या वादाच्या रागातून तेजस कांबळे, अजय महाजन, निरज सातपुते, नदिम शेख, अभिजित ओव्हाळ, सनी सानक्य हे मोठ मोठ्याने आरडाओरडा करत दहशत माजवत़ गायकवाड यांच्या घरात आले. तेजस कांबळे याने घरातील दरवाजावर कोयता मारला. गॅसची शेगडीवर व पाण्याच्या हांड्यावर तसेच घरात ठिकठिकाणी भिंतीवर कोयता मारला. त्याच्या साथीदारांनी खिडकीतून सिमेंटचा ब्लॉक मॅसेजमधून संडासच्या खिडकीवर मारला. त्यामुळे संडासचा दरवाजा फुटला. त्यांनी राहुलवर कोयता उगारला. तेव्हा त्यांच्या वडिलांनी तेजसला ढकलून दिल्याने तो लागला नाही. त्यावेळी त्यांनी राहुल व त्याच्या आई वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मोठ मोठ्याने शिवीगाळ व दमदाटी करुन दहशत माजविली.

शेजारच्या फ्लॅटच्या बाहेर असलेल्या झाडाच्या कुंड्या फोडल्या. त्यामुळे शेजारी राहणार्‍यांनी आपली दारे खिडक्या लावून घेतल्या. श्रावणधारा सोसायटीच्या पार्किंग मध्ये अशाच प्रकारे दहशत माजवुन नितीन चव्हाण, हर्ष नाईक यांनाही मारहाण केली. त्यात हर्ष नाईक यास डोक्यात जखम झाली आहे. राहुल गायकवाड व हर्ष नाईक यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

यातील मुख्य आरोपी सुरज कदम याच्यावर गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगितले जाते. याविषयी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण यांनी सांगितले की, फिर्यादी यांची फिर्याद ई साक्षमध्ये नोंदविली आहे. त्यात त्यांनी ज्यांची नावे घेतली. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ त्यातील पाच जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडी दिली आहे. फिर्यादी यांचा पुरवणी जबाब घेण्यात येत असून त्या जबाबानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

You may have missed