Mahabaleshwar Satara Crime News | सातारा: वाईन शॉपचा परवाना देण्याच्या बहाण्याने 1 कोटीचा गंडा, पुण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह 9 जणांवर FIR

पाचगणी : Mahabaleshwar Satara Crime News | हिलस्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे एका हॉटेल व्यावासायिकाला एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे (Cheating Fraud Case). याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील Crime Investigation Department (CID) पुणे पथकातील अतरिक्त पोलीस अधीक्षकांसह (Addl SP Pune Pathak) नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित व्यावसायिकाला वाईन शॉपचा परवाना (Lure Of Wine Shop License) मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली.

हेमंत बाळकृष्ण साळवी असे फसवणूक झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (पुणे विभाग) आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधीक्षक देवश्री मोहिते (Devshree Mohite) यांनी सोमवारी वाई पोलीस ठाण्यात (Wai Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील पुणे पथकातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे (Shrikant Kolhapure) यांच्यासह हनुमंत विष्णुदास मुंडे (
Hanumant Vishnudas Munde), विवेक पंडित, नीलेश पटेल, अभिमन्यू देडगे, राजन सुर्यभान सोनवणे (Rajan Suryabhan Sonwane), शकील हाजी मकबूल सय्यद, नजमा शेख व बाळू पुरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथील साबणे रोडवरील हॉटेल व्यावसायिक हेमंत साळवी यांना राज्य गुन्हे अन्वेषण शाखा (पुणे विभाग) अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे, हनुमंत मुंडे, विवेक पंडित यांना वाइन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च येत असल्याचे सांगून वेळोवेळी संजय बाजीराव साळुंखे यांच्या मध्यस्थीने 1 कोटी 50 लाख रुपये रोख व चेकने वाई येथील विविध ठिकाणी स्वीकारले. (Mahabaleshwar Satara Crime News)

मात्र त्यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा परवाना मिळाला नाही.
त्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संजय साळुंखे यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक,
पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाच्या चौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आला आहे.
त्यानुसार नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…

Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल

You may have missed