Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा ‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

amit shah devendra fadnavis

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) कंबर कसली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maharashtra Reservation) मुद्द्याने लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला होता. मात्र आता त्यानंतर हरियाणा मध्ये भाजपने मिळवलेला विजय महाराष्ट्रातील भाजपसाठी डोस समजला जात आहे.

https://www.instagram.com/p/DA5XTqzJM5G

हरियाणा सरकारने ५० दिवसांत घेतलेले १२६ निर्णय हे निकाल बदलणारे ठरले, असे मानले जाते. महाराष्ट्रातही भाजपने निर्णयांचा धडाका लावला आहे. या आधारावरच आगामी निवडणूक जिंकता येईल, असा सूर भाजपकडून व्यक्त करण्यात येत आहे. (Mahayuti News)

https://www.instagram.com/p/DA5T-bap9Lv

हरियाणातील अत्यंत कठीण विधानसभा निवडणूक जिंकताना भाजपने जागांची नाराजी लक्षात घेत अन्य जातींना एकत्र आणून ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. आता त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मराठेतर समाजांचे मेळावे घेत भाजप मतांची बेगमी करत आहे. पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी आजपर्यंत १६८ छोट्या – मोठ्या जातींचे मेळावे घेतले आहेत. (BJP News)

https://www.instagram.com/p/DA5SKXCJOeF

मराठा समाजाला समवेत आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच या मराठेतर जातींना भाजपने जोडून घेतले आहे. राज्यात मराठा समाज भाजपवर नाराज आहे. त्यामुळे भाजपने ‘प्लॅन बी’ म्हणून ओबीसी समाजाचे छोटे-छोटे मिळावे सातत्याने आयोजित करणे सुरू ठेवले आहे. या आधारावरच नवे सामाजिक समीकरण प्रत्यक्षात येण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते.

https://www.instagram.com/p/DA5QnnqJtiH

भूपेंद्र यादव यांनी गेले काही दिवस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ‘सागर’ बंगल्यात मांडव घालून छोट्या जातींशी संवाद साधण्याचा उपक्रम चालू ठेवला आहे. हरियाणात भाजपला मदत करण्यासाठी संघ परिवाराने पडद्यामागून नेहमीपेक्षा अधिकच सक्रिय रीत्या मदत केली असल्याचे बोलले जातेय. यावेळी महाराष्ट्रातील संघ परिवाराचे कार्यकर्ते अत्यंत हिरिरीने प्रचारात उतरतील, अशी माहिती आहे. असे झाल्यास महाराष्ट्रात त्याचा फायदा भाजपला होईल.

https://www.instagram.com/p/DA5NGFMpQRd

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed