Maharashtra Assembly Election 2024 | भाजपाकडून मुंबईत यंदा दोन सख्ख्ये भाऊ एकत्र निवडणूक लढवणार; राजकीय वर्तुळात चर्चा

Badlapur BJP Nagarsevak | Accused in Badlapur sexual assault case accepted as corporator; BJP's decision angers the entire state

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर भाजपने (BJP) आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. (BJP Candidates List For Maharashtra Assembly)

यामध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांना पुन्हा एकदा वांद्रे पश्चिम मधून उमेदवारी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे, आशिष शेलार यांचे मोठे भाऊ असलेले भाजप प्रदेश प्रवक्ते आणि मुंबई भाजप सचिव विनोद शेलार (Vinod Shelar) यांनाही मालाड पश्चिममधून पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली आहे. गेली १० वर्षे विनोद शेलार यांनी हा मतदारसंघ बांधला आहे. त्यांचे काम पाहून पक्षांने यंदा त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

२०१२ ते २०१७ मध्ये नगरसेवकपद भूषवणारे विनोद शेलार पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक लढवणार आहे. त्यामुळेच मुंबईत यंदा लहान भाऊ आणि मोठा भाऊ एकत्र निवडणूक लढवणार आहेत.

मालाड पश्चिममधून भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना देखील निवडणूकीच्या रिंगणात होते,
मात्र त्यांची मनधरणी करत पक्षाने विनोद शेलार यांना निवडणुकीचे तिकीट दिले.
२००९ पासून सलग तीन वेळा मालाड पश्चिमचे विद्यमान काँग्रेसचे आमदार व
माजी मंत्री अस्लम शेख यांना शेलार यांचे यंदा कडवे आव्हान असणार आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed