Maharashtra Assembly Election 2024 | पुण्यातील कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, पिंपरी या विधानसभा मतदारसंघावर आरपीआय दावा ठोकणार; आठवले विधानसभेचे डावपेच आखण्याच्या तयारीत
ऑनलाइन टीम – Maharashtra Assembly Election 2024 | केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale ) यांनी महायुतीवर (Mahayuti) दबावतंत्र सुरू करत विधानसभेला 12 ते 15 जागा सोडाव्यात, अन्यथा आंबेडकरी जनतेत रोष वाढेल असं म्हंटलं आहे. तसेच पुण्यातील पुण्यातील कॅन्टोन्मेंट (Pune Cantonment Assembly), वडगाव शेरी (Vadgaon Sheri Assembly), पिंपरी (Pimpri Assembly) या विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकणार असल्याचं ही सांगितले आहे.
आठवले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये इतर पक्षांच्या वाटाघाटी सुरू असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला विचारात घेत नाही. लोकसभेला आम्ही जुळवून घेतले परंतु विधानसभेला आम्हाला १२ ते १५ जागा सोडाव्यात. लोकसभेला देशव्यापी नेतृत्वाचा विचार करून आम्ही एक पाऊल मागे घेतलेले होते. परंतु विधानसभेला आम्हाला जागा दिल्या नाहीत तर आंबेडकरी जनतेत रोष वाढेल आणि पर्यायाने महायुतीला फटका बसेल, असा इशारा आठवले यांनी महायुतीला दिलाय.
ऊस धारक शेतकरी चिन्हावर लढवणार निवडणूक
ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला ऊस धारक हे शेतकरी चिन्ह मिळालेले आहे. म्हणून आम्ही या पुढच्या निवडणुका ऊस धारक शेतकरी या चिन्हावर लढवणार आहोत. 25 ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांच्याशी चर्चा करून विधानसभा निवडणूकांचे रणशिंग फुंकण्याची तयारी सुरू आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर ‘माझा’ ही फोटो असावा
आठवले यांनी म्हंटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सध्या राज्यात लोकप्रिय ठरत आहे. या योजनेच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची छायाचित्रे आहेत. या सगळ्या नेत्यांच्या छायाचित्राबरोबरच आपलाही फोटो असावा.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा