Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादीच्या फुटीचा काँग्रेस फायदा करून घेणार; जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार

nana-patole-sharad-pawar

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचा फायदा शिवसेना ठाकरे गटापेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar NCP) काही आमदारांना घेऊन महायुती सरकारमध्ये (Mahayuti Govt) सहभागी झाले. राष्ट्रवादीच्या याच फुटीचा फायदा पुणे जिल्हा काबीज करण्यासाठी काँग्रेसचा (Congress) मनसुबा आहे.

पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढलेला आहे. तशीच कामगिरी आता काँग्रेसला विधानसभेत करायची आहे. याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून रणनीती आखण्यात येत आहे. काल पुण्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्राची बैठक पार पडली. आगामी निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेला फुटीचा फायदा घेण्याचा सल्ला पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झालेत त्याचा आपण फायदा घेऊ आणि आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील जास्तीच्या जागा आपण पदरात पाडून घेऊ. पुण्यामध्ये काँग्रेसचे संघटन पूर्वीपासून मजबूत राहिले आहे. पुण्यात काँग्रेसची ताकद आहे. मात्र आता सर्व कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे.

संघटनात्मक बैठका ब्लॉकच्या मीटिंग वेळेवरती व्हायला हव्यात. तसेच अंतर्गत मतभेद मिटवून उमेदवार कोण आहे. यापेक्षा काँग्रेस संघटनेला महत्त्व देणे आवश्यक आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मतभेद न ठेवता एक दिलाने काम केल्यास यश आपलेच आहे, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्ह्यात असलेल्या २१ विधानसभा मतदारसंघांपैकी २०१९ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल १० जागा आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. तर दुसरीकडे काँग्रेसचे ३ आमदार सध्या पुणे जिल्ह्यात आहे. ही संख्या वाढवण्याचा आणि पुणे जिल्हा काबीज करण्याचा ‘मास्टर प्लॅन’ काँग्रेसकडून आखला जातोय का? आणि त्यासाठी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीलाच टार्गेट करण्यात येणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

२०१९ च्या निवडणुकीत १० विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला.
त्या खालोखाल भाजपा देखील ९ जागांवरती विजयी झाली. तर काँग्रेसला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले होते.
कसबा पोटनिवडणुकीमध्ये (Kasba Assembly) भाजपचा पराभव करत काँग्रेसने विजय साकार केला.
त्यामुळे सध्या पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदारांची संख्या ही तीनवर पोहोचली आहे.
मात्र, यंदा आमदारांची संख्या वाढवण्यासाठी काँग्रेसने मास्टर प्लॅन आखला आहे. (Sharad Pawar NCP)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MVA CM Candidate Issue | शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाची मवाळ भूमिका; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला

Jaydeep Apte Arrest | शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक; जयदीप कसा पकडला गेला जाणून घ्या

Hadapsar Pune Crime News | अट्टल वाहनचोराकडून साडेबारा लाखांच्या तब्बल 24 दुचाकी हस्तगत; हडपसर पोलिसांची कामगिरी

Pune ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

You may have missed