Maharashtra Assembly Election 2024 | ‘काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी तशी भूमिका घ्यावी’, हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचा प्रहार; म्हणाले – ‘कोणीही स्वतःला मोठा भाऊ…’

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | हरियाणात काँग्रेस अंतर्गत वाद, तसेच भाजपने झालेली मुसंडी, या साऱ्या गोष्टींचा परिणाम राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकांवर होणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्याचे पडसाद राज्यात महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) पाहायला मिळत आहेत.
https://www.instagram.com/p/DA5JlDdJdG1
हरियाणा निकालावरून शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) काँग्रेसला घेरल्याचे पाहायला मिळत आहे. “कोणीही स्वतःला मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ समजू नये’, अशा शब्दात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. तसेच हरियाणाचा परिणाम इथे होणार नाही कारण इथे शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासारखे जागृत नेते आहेत, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
https://www.instagram.com/p/DA5NGFMpQRd
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ” ज्या राज्यात काँग्रेस कमकुवत असेत तिथे ते इतर प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी करून निवडणूक लढतात आणि ज्या राज्यात काँग्रेसला वाटतं की इथे आपण मजबूत आहोत, इथे आपली हवा आहे, तिथे ते इतर पक्षांना, आपल्या सहकाऱ्यांना दूर ठेवतात. त्यामुळे हरियाणासारखे निकाल लागतात.
https://www.instagram.com/p/DA5O7vSp5Jn
हरियाणाच्या निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून सामोरे गेलो असतो तर या निकालात बदल दिसला असता. इंडिया आघाडीला बहुमत मिळाले असते. काँग्रेसच्या ९ जागा कमी पडल्या. हा फार मोठा फरक नाही. अर्थात या निकालाने आम्ही निराश झालेलो नाही.
https://www.instagram.com/p/DA5SKXCJOeF
परंतु, काँग्रेसला एक भूमिका घ्यावी लागेल. अनेक राज्यात निवडणुका होणार आहेत. तिथे काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी तशी भूमिका घ्यावी. मग त्या-त्या राज्यातील इतर प्रादेशिक पक्ष आपापल्या भूमिका घेतील “, असे संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
https://www.instagram.com/p/DA5XTqzJM5G
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण