Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद; मविआकडून बैठकांचे सत्र सुरु
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi Seat Sharing) जागावाटपावरून चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र काही ठिकाणी एकाच जागेसाठी तीनही पक्षांनी तर काही जागांवर दोन पक्षांनी दावा केल्याने मविआत वादाची ठिणगी पडली आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात मुंबईत बैठक झाली. मात्र या बैठकीतही काही जागांवर घोडं अडल्याने फॉर्म्युला न ठरताच बैठक संपली.
या बैठकीत काँग्रेस (Maharashtra Congress) आणि ठाकरे गटामध्ये (Shivsena UBT) मतभेद झाल्याचे समोर आले. मुंबईच्या काही जागांवर तिन्ही पक्ष तर काही जागांवर दोन पक्ष दावा करत आहेत. त्यामुळे अजूनही पुढील बैठकीमध्ये मुंबईतील जागा संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट अजूनही २० ते २२ जागांवर आग्रही आहे. तर त्यातील काही जागांवर काँग्रेस आग्रही आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Sharad Pawar NCP) पाच ते सात जागांवर आपला दावा सांगितला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ ला महाविकास आघाडीतील पक्षांनी जिंकलेल्या जागा सोडून इतर १६ जागांवर अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात चर्चा सुरू आहे. मात्र काही जागांवर तिन्ही पक्षांनी तर काही जागांवर दोन पक्षांनी दावा केल्याने मुंबईतील जागांवर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कालची (दि.२६) बैठक जागावाटपाचा फॉर्म्युला न ठरवता संपवण्यात आली आहे. मुंबईतील जागांवर निर्माण झालेला पेच आता दिल्लीतील वरिष्ठ नेते सोडवणार असल्याची माहिती आहे.
‘महाविकास आघाडीत जागावाटपावर चर्चा होईल तेव्हा थोडे वाद होणं अपेक्षित आहे,
असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आधीच म्हटलं आहे.
पाटील यांनी मविआमध्ये वादाची शक्यता देखील वर्तवली आहे.
मात्र, जागावाटपावरून निर्माण झालेले वाद मिटवून आम्ही एकमेकांना समजून घेऊ व पुढे जाऊ,
असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय