Maharashtra Assembly Election 2024 | अजित पवारांसोबत गेलेले आमदाराची विधानसभा निवडणुकीतून माघार; शरद पवारांच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय

sharad-pawar-ajit-pawar

माढा : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली आहे. इच्छुक उमेदवार जागावाटपाचा कल पाहून पक्षांतर करताना दिसत आहेत. त्यांनी मतदारसंघात सभा, बैठका सुरु केलेल्या आहेत.

राज्यात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) दोन पक्ष फुटल्यानंतर राजकीय घडी विस्कटल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान माढा मतदारसंघातून महत्वाची घडामोड समोर येत आहे. अजित पवारांसोबत (Ajit Pawar NCP) गेलेले आमदार बबन शिंदे (MLA Baban Shinde) यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार जाहीर केली आहे.

बबन शिंदे यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगत मुलाला पुढे केले आहे. मला तुम्ही ६ वेळा आमदार केले. आता माझ्या ऐवजी रणजित शिंदेला (Ranjit Shinde) संधी द्या असे आवाहन त्यांनी केले आहे. माढा मतदारसंघात (Madha Assembly Constituency) शरद पवारांचे (Sharad Pawar NCP) वर्चस्व आहे. तरीही बबन शिंदे यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले होते.

लोकसभा निवडणुकीत भाजपाचे खासदार (BJP MP) पडल्यानंतर बबन शिंदे यांनी पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
येण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यासाठी ते वारंवार शरद पवारांची भेट घेत आहेत.

आता शिंदे कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळवितात अशी चर्चा सुरु असताना त्यांनी आपल्या मुलाला उमेदवार करणार असल्याचे जाहीर केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील विकास कामांच्या उद्घाटनावेळी बबन शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.

आता रणजितला संधी देताना तो कसा काम करतो ते पहा, काम नाही आवडले तर पुढच्यावेळी त्याला मत द्यायचे की नाही ते ठरवा.
मग पुढच्यावेळी वेगळा विचार करावा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद