Maharashtra Assembly Election 2024 | माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; लोकसभेला भाजप उमेदवाराला दिला होता पाठिंबा

Omi Papu Kalani-Sharad Pawar

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (Sharad Pawar NCP) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज मुंबईमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. (Maharashtra Assembly Election 2024)

https://www.instagram.com/p/DA8XlQGJpCD

दरम्यान माजी आमदार पप्पू कलानी (Papu Kalani) यांचे पुत्र ओमी कलानी (Omi Kalani) आणि सून पंचम कलानी (Pancham Kalani) हे जयंत पाटील (Jayant Patil) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या भेटीसाठी दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून (Ulhasnagar Assembly Constituency) निवडणूक लढण्यास दोघेही इच्छुक असल्याची माहिती आहे.

https://www.instagram.com/p/DA8RujVJ0yp

लोकसभा निवडणुकीत ओमी कलानी आणि पंचम कलानी यांनी महायुतीचे खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता आगामी विधानसभेसाठी ते तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

https://www.instagram.com/p/DA8QelrptCP

ओमी कलानी आणि पंचम कलानी यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन विधानसभा उमेदवारी बाबत चर्चा केली होती. महाविकास आघाडीकडून तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया त्यावेळी ओमी कलानी यांनी दिली होती.

https://www.instagram.com/p/DA8F5YMp2pq

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)