Maharashtra Assembly Election 2024 | पक्षाची पडझड झाली तरी पुन्हा डाव सावरला; पवारांचे जुने मावळे तुतारी फुंकणार; विधानसभेची रणनीती अधिक प्रभावी ठरणार

sharad-pawar

पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्रात फिरून ज्या पद्धतीने पक्षाची मोट पुन्हा एकदा बांधली आणि आपल्याकडे विजयश्री खेचून आणला ते पाहता शरद पवार यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रात जादू पाहायला मिळाली. पक्षाची कितीही पडझड झाली तरी आपण पुन्हा डाव सावरू शकतो आणि पुन्हा एकदा टक्कर देऊ शकतो, असे शरद पवार यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे.

https://www.instagram.com/p/DA5jp4ACFse

लोकसभा निवडणुका संपताच आनंदोत्सव साजरा करत न बसता शरद पवारांनी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी माणसं हेरून ठेवली होती आणि त्या माणसांना आता पवार आपल्या गळाला लावत आहेत, पवारांची ही निवडणुकीतील रणनीती अधिक प्रभावी ठरू शकते, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

https://www.instagram.com/p/DA5hRh8CpJH

महायुतीच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामध्ये समरजितसिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील, बापू पठारे यांचा समावेश आहे. तर नवी मुंबईतून शिंदे गटाचे विजय नाहटा, बार्शीमधून दिलीप सोपल, मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राजन पाटील, रमेश कदम, मावळ विधानसभा मतदारसंघातून बाळा भेगडे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विवेक कोल्हे, सातारा जिल्ह्यातून रामराजे नाईक निंबाळकर, वाई मतदारसंघात मदन भोसले, नवी मुंबईतून गणेश नाईक, माढा मतदारसंघात रणजीत शिंदे, पंढरपूर मतदारसंघात प्रशांत परिचारक हे नेते शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हातात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://www.instagram.com/p/DA5dAbviU_i

राज्यामध्ये पुन्हा एकदा कोणत्या मतदारसंघात कोणत्या नेत्याचा प्रभाव आहे, जनतेच्या मनात त्या नेत्याविषयी काय भावना आहेत. जिंकून येण्याची नेत्याची क्षमता किती आहे आणि आपल्याला त्याला किती मदत द्यावी लागेल, याविषयी शरद पवार चाचपणी करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DA5XTqzJM5G

मतदारसंघा निहाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कोणते मतदारसंघ येतील, याचा अंदाज बांधून संबंधित मतदारसंघात कोणाला तिकीट देता येईल, कोण प्रबळ दावेदार आहे, याचा विचार करून शरद पवार आखणी करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/DA5SKXCJOeF

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar NCP | अजित पवारांच्या बालेकिल्ल्यातील नेता पक्षाला रामराम करणार;
संकेत देत म्हणाले – ‘तुतारी फुंकल्यावर आवाज येणारच!’

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed