Maharashtra Assembly Election 2024 | ‘ही शिंदे-फडणवीसांची मैना, केली महाराष्ट्राची दैना !’, काँग्रेसच्या प्रचाराची चर्चा, रणनीतीनुसार सर्वाधिक फोकस फडणवीसांवर
नागपूर: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. प्रचार हटके होण्यासाठी विविध पद्धती अवलंबवली जात आहे. एकीकडे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शहरात मोठमोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन, उदघाटने करीत असताना काँग्रेसकडून महायुतीच्या (Mahayuti) काळात राज्यातील किती व कोणते उद्योग गुजरातला पळवले याची माहिती देणारे रथ तयार करण्यात येत आहेत.
https://www.instagram.com/p/DA8Aeq6C9fF
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या निवासस्थानासमोर एक रथ तयार करण्यात आला आहे. ‘ ही शिंदे फडणवीसांची मैना, केली महाराष्ट्राची दैना’, भष्टयुती टेम्पो सर्विस, उद्योग गुजरातला घेऊन जाणार’ हे रथावरील फलक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात दोन नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.
https://www.instagram.com/p/DA8EswHp786
या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध होणार आहे याचीही माहिती देण्यात आली. त्यानंतर नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपच्या वतीने शहरात किती प्रकल्प आणले, उद्योग आले, किती कोटींची विकास कामे केली याच्या धडाक्यात जाहिराती केल्या जात आहेत.
https://www.instagram.com/p/DA8DN7lpPyJ
शहराच्या कानाकोपऱ्यात मोठमोठे फलक लावण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात सध्या पोस्टर वॉर सुरू आहे. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार प्रफुल गुडधे यांचे फलकही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
https://www.instagram.com/p/DA79178psxU
छत्रपतींचा पुतळा कोसळला या पार्श्वभूमीवर ‘महाराज आम्हाला माफ करा’ आणि ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे गुडधे यांचे फलक सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फलकाच्या माध्यमातून गुडधे कोणावरही थेट टीका न करता काँग्रेसचा संदेश घरोघरी पोहचवत आहे. आता यात नव्या रथाची भर पडली आहे.
https://www.instagram.com/p/DA742QEJvWD
महाराष्ट्रातील उद्योग कसे गुजरातला पळवले याची माहिती दिली जात आहे. महायुती सरकारने राज्यातील उद्योग गुजरातला पळवण्यासाठी टेम्पो सर्विस सुरू केली असल्याचे या माध्यमातून मतदारांना सांगण्यात येत आहे. हे बघता विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा सर्वाधिक फोकस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राहणार असल्याचे दिसून येते.
https://www.instagram.com/p/DA71QCJpZ4P
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण