Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुका कधी होणार?, जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ऑक्टोबरमध्ये निवडणुका…

Jayant Patil

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | यांना आता ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याचे धाडस होणार नाही. त्यामुळे दिवाळीनंतरच हे निवडणुका घेतील. 15-20 नोव्हेंबरदरम्यान निवडणुका घेतील असा माझा अंदाज आहे. त्याआधी त्यांची निवडणूक घेण्याची ताकद नाही, असे वक्तव्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे. ते मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात (Mahavikas Aghadi Melava) बोलत होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, सरकार निवडणूक कधी घेणार याचा अंदाज येत नव्हता. आज निवडणूक आयोग पत्रकारांसमोर हरियाणा आणि झारखंडची निवडणूक जाहीर करतील. महाराष्ट्र सरकार (Mahayuti Govt) घाबरणारे सरकार आहे. यांना निवडणुकांची भीती वाटत आहे. लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना मोठा धक्का दिला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

मोदी सरकारवर (NDA Modi Govt) टीका करताना जयंत पाटील म्हणाले, नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू
या दोन बेभरवशाच्या टेकूंवर सरकार उभे आहे. 400 पारचा नारा देणारे 240 वर थांबले. तेव्हा दोघांचे टेकू घेतले.
दोघे एवढे पलटी मारण्यात माहीर आहेत, की दिल्लीतले सरकार कधी पडेल याची खात्री नाही.
त्यामुळेच 6 महिने की वर्षभर एवढाच विषय राहिला आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग

Hadapsar Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलांनी नामांकित शाळेतील मुलींचे नग्न फोटो तयार करुन केले व्हायरल

Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन

You may have missed