Maharashtra Politics | भाजपचा ब्रँड डॅमेज? संघाच्या टीकेनंतर अजित पवारांना रोखण्याचा भाजपचा प्लॅन; जागावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित
पुणे : Maharashtra Politics | लोकसभेत भाजपला फटका बसल्यानंतर महायुतीत (Mahayuti) अजित पवारांचा (Ajit Pawar NCP) केलेला समावेश यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) भाजपला (BJP) खडेबोल सुनावले होते. तसेच संघाच्या मुखपत्रातून टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता भाजपकडून अजित पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखण्याची रणनीती आखली जात आहे.
अजित पवारांसोबतची हातमिळवणी केल्याने भाजपचा ब्रँड डॅमेज झाला. त्याचा फटका भाजपला लोकसभेला बसला, अशी मांडणी संघाशी संबंधित ऑर्गनायझरनं पराभवाचं विश्लेषण करताना केली. त्यानंतर आता भाजप दक्ष झाला आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांशी बैठका सुरु आहेत. अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यासाठी विशेष व्यूहरचना आखली जात आहे. अजित पवार गटाला पुण्यातील ग्रामीण मतदारसंघ सोडायचे आणि शहरातील जागा आपण लढवायच्या, अशी रणनीती भाजपकडून आखण्यात येत आहे. पक्षानं यासाठीचं सूत्र जवळपास नक्की केलं आहे. त्यानुसार जागावाटप करण्यात येईल.
पुण्याच्या शहरी भागातील जवळपास सगळ्याच जागांवर भाजप दावा सांगण्याच्या तयारीत आहे. तसं झाल्यास अजित पवारांच्या दोन विद्यमान आमदारांची गोची होऊ शकते. वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांची भाजपमुळे अडचण होण्याची शक्यता आहे.
मागेच जुन्नरमध्ये आशा बुचके (Asha Buchake) यांनी अजित पवारांच्या विरोधात आंदोलन केले होते.
अजित पवार गटाला रोखण्याची मागणी पुणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठांकडे केली जात आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यातील ग्रामीण भागात अधिकाधिक जागा देऊ आणि शहरातील जागा आपल्याला ठेवू.
अशाच प्रकारे जागावाटप करण्यात येईल, असं नेतृत्वाकडून पुण्यातील नेत्यांना सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून