Maharashtra Politics News | विधानसभेपूर्वी भाजपला बसणार मोठा धक्का? बडा नेता पक्षबदल करण्याच्या तयारीत
इंदापूर : Maharashtra Politics News | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून राजकीय नेत्यांच्या बैठका, सभा, दौऱ्यांना वेग आलेला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी ही लढत होणार आहे. दोन्हीकडे तीन-तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे एकूणच जागावाटपाबाबतचा तिढा वाढताना दिसत आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात (Indapur Assembly Constituency) अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) दत्तात्रय भरणे (Dattatrya Bharne) हे विद्यमान आमदार आहेत. याच मतदारसंघातून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) इच्छुक आहेत.
मात्र मागील दोन दिवसांपूर्वीं अजित पवार यांनी ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटालाच सुटेल असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे आगामी काळात हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महायुतीत ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा सुटेल असा फार्म्युला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
त्यामुळे आता इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील पक्षबदल करण्याच्या तयारीत आहेत. ते लवकरच शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) प्रवेश करतील अशा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय. हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास हा भाजपासाठी मोठा धक्का असणार आहे. त्यातच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक विधान केल्याने चर्चानी आणखीनच जोर धरला आहे.
माध्यमांसोबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते असून ते लवकरच मोठा निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा असेल. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या सूचक विधानानंतर इंदापूर मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात उलट-सुलट चर्चाना उधाण आलं आहे.
हर्षवर्धन पाटील हे भाजपाच्या तिकिटावर (BJP Candidate) इंदापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.
मात्र, सध्या हा मतदारसंघ अजित पवार यांच्या ताब्यात आहेत.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्तात्रय भरणे हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.
२०१९ साली त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. (Maharashtra Politics News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा