Maharashtra Politics News | मातोश्रीवर महाविकास आघाडीची तातडीची बैठक; पवार, पटोलेंसह इतर नेतेही राहणार उपस्थित; राजकीय वर्तुळाचे लक्ष
मुंबई : Maharashtra Politics News | महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) महत्वाची बैठक आज (दि.२८) सायंकाळी ‘मातोश्री’वर होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) शरद पवार (Sharad Pawar), नाना पटोले (Nana Patole) आणि संजय राऊत (Sanjay Raut) हे महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे संपुर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात गंभीर घटना घडत आहेत. राज्यात जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटकांना सत्ताधारी पाठिंबा देत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी माहिती मिळत आहे. मविआची रणनीती या बैठकीत ठरणार आहे.
बदलापूर प्रकरण (Badlapur Case), पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर झालेला हल्ला (Koyta Attack On Police Officer), राज्यात महिला व बाल अत्याचाराची मालिकाच सुरु झालेली आहे. हिंसक घटनांमध्ये झालेली वाढ त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र आहे. (Maharashtra Politics News)
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला (Malvan Shivaji Maharaj Statue).
त्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून