Mahavikas Aghadi On PM Modi Maharashtra Tour | पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला महाविकास आघाडीकडून विरोध

PM-Narendra-Modi

छत्रपती संभाजीनगर : Mahavikas Aghadi On PM Modi Maharashtra Tour | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात येत आहेत. ११ लाख लखपती दिदींना (Lakhpati Didi Scheme) येथे प्रमाणपत्रं वाटली जाणार आहेत. यासाठी जळगावात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना राज्यातील गंभीर घटनांची माहिती करून देण्यासाठी महाविकास आघाडीने आंदोलन पुकारलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा युक्रेन दौरा आटपून मायदेशी परतले आहेत. आता ते थेट महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मोदी विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उतरून तेथून ते जळगावला जाणार आहेत.

महाराष्ट्रातील व देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केलं आहे. मविआ कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळाबाहेर निषेध आंदोलन केलं. मात्र, पोलिसांनी अंबादास दानवे आणि मविआ कार्यकर्त्यांना ताब्यात घेत हे आंदोलन थांबवलं आहे.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर मानवी साखळी तयार केली होती.
तसेच अनेकांच्या हातात बदलापूरमधील घटनेचा निषेध नोंदवणारे पोस्टर्स होते.
काळे कपडे परिधान करून हे आंदोलक विमानतळाबाहेर उभे ठाकले होते.
मात्र पोलीस आता आंदोलकांना तिथून घेऊन गेले आहेत. (Mahavikas Aghadi On PM Modi Maharashtra Tour)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”