Mahayuti Govt | अवघ्या आठवडाभराच्या प्रचारासाठी महायुती सरकार 90 कोटी रुपये खर्च करणार; विरोधकांचे टीकास्त्र

मुंबई: Mahayuti Govt | विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर आहेत. सर्वच पक्षांची तयारी सुरु आहे. नेते दौरे, सभा यामध्ये व्यस्त आहेत. राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. दरम्यान आचारसंहिता लागण्यापूर्वी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने काढलेल्या टेंडरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. (Tender For Social Media Advertising)
https://www.instagram.com/p/DA5tsteJuxm
सरकारी योजनांची माहिती महाराष्ट्रभर सोशल मीडियाद्वारे मिळावी यासाठी राज्य सरकार तब्बल ९० कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून योजनांच्या केल्या जाणाऱ्या जाहिरातीच्या खर्चावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे.
https://www.instagram.com/p/DA5rLDBpWmu
वेबसाईड, ई पेपर, न्यूज ऍप, सोशल ऍप, ओटीटी प्लॅटफॉर्म, बॅनर्स व्हिडिओ ऍड, कॉलर आयडी ॲप, पब्लिक स्क्रीन्स, व्हाट्सअप व्हिडिओ मेसेज अशा विविध पद्धतीने सोशल मीडियावर योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचंचे हे शासनाचे टेंडर आहे.
https://www.instagram.com/p/DA5sXckpode
आचारसंहिता लागण्यापूर्वी शेकडोने शासन निर्णय, कॅबिनेट निर्णय आणि टेंडर मोठ्या संख्येने काढले जात आहेत. त्यातच, आता या टेंडर मुळे राज्य सरकार फक्त सोशल मीडियावर अवघ्या आठवडाभराच्या प्रचारासाठी ९० कोटी रुपये खर्च करणार आहे का?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
https://www.instagram.com/p/DA5XTqzJM5G/
दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील म्हणाले, “फक्त काही दिवसांकरिता डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारने ९० कोटी रुपयांचे टेंडर काढलेले आहे. आतापर्यंत या सरकारने जवळपास दीड हजार कोटी फक्त प्रसिद्धीसाठी खर्च केले आहेत.
https://www.instagram.com/p/DA5T-bap9Lv
या दीड हजार कोटी रुपयांमध्ये माझ्या शेतकऱ्यांना मोठी मदत देता आली असती, माझ्या तरुणांचा कौशल्य विकास करता आला असता, माझ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश मिळाले असते. ग्रामीण, आदिवासी भागातील किती रस्ते झाले असते. विचार करा या पैशांमध्ये किती लाडक्या बहिणींना मदत झाली असती. पण, शेवटी महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार”, असे जयंत पाटील यांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमवरून म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/DA5SKXCJOeF
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण