Mahayuti Seat Sharing Formula | ‘महायुतीत फक्त 80 जागांवर चर्चा होणार, उर्वरित जागांचा प्रश्न येतच नाही’, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य; शिंदे गटासह अजित पवार गटात चिंतेचे वातावरण
मुंबई: Mahayuti Seat Sharing Formula | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याचे महाराष्ट्र दौरे (Amit Shah Maharashtra Tour) वाढलेले आहेत. महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. लोकसभेला भाजपला (BJP) मोठा फटका बसला त्यामुळे आता विधानसभेला भाजप मोठा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे.
https://www.instagram.com/p/DAWIGC6C0UN/?img_index=1
दरम्यान आता भाजपाने रणनीती आखली आहे. विधानसभेला जास्तीत जास्त जागा लढण्याचा आणि जिंकून आणण्याचा भाजपचा संकल्प आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जागावाटपावरून मोठे वक्तव्य केले आहे.
https://www.instagram.com/p/DAXjsR2zQli
जे आमदार आहेत त्या जागांवर जागा वाटपाची चर्चा होणार नसल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. आमच्याकडे २०८ आमदारांचा पाठिंबा आहे. यामुळे वाटपाच्या बैठकीत यावर चर्चा करण्याची गरजच नाही. उरलेल्या ८० जागांवर वाटपाची चर्चा केली जाणार आहे, असे शेलार यांनी सांगितले. शेलार यांनी बुधवारी जो दावा केला आहे त्यावरून अजित पवार गट (Ajit Pawar NCP) आणि शिंदे गटात (Shivsena Shinde Group) चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
https://www.instagram.com/p/DAXleTqJepX
केंद्रीय मंत्री अमित शहा नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेले आहेत. भाजपने १५० ते १६० जागा लढाव्यात आणि मित्रपक्ष असलेली शिंदेसेना आणि अजित पवार गटाने उर्वरित जागा लढवाव्यात, असे शहा यांनी सुचविल्याची खात्रीलायक माहिती आहे. भाजप काही केल्या १५० जागांखाली येण्याची शक्यता नाही. यामुळे शिंदेसेना व अजित पवार गटाच्या वाट्याला १३३ जागा येतील.
https://www.instagram.com/p/DAXn2EnJlCI
शिंदे यांच्यासोबत स्वतःचे ४० व १० अपक्षांसह ५० आमदार आहेत. अजित पवार गटाकडे काँग्रेसच्या ३ आमदारांसह ४४ आमदार आहेत. शिंदे व अजित पवार गट मिळून आमदार संख्या ९४ इतकी आहे. (Mahayuti Seat Sharing Formula)
https://www.instagram.com/p/DAWFrtkpWvW
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”