Maheshwari Samaj Pune | माहेश्वरी समाजाच्या माहेश्वरी परिचय पुस्तिका विमोचन समारोह संपन्न

Maheshwari Samaj Pune

पुणे : Maheshwari Samaj Pune | पुणे जिल्हा माहेश्र्वरी प्रगती मंडळ, जिल्हा सभा, महिला समिती, युवा समिती द्वारा आयोजित “माहेश्वरी समाजाच्या माहेश्वरी परिचय पुस्तिका विमोचन समारोह” टिळक स्मारक मंदिर येथे पार पडला.

ह्या कार्यक्रमाची सुरुवात श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ, पुणे यांच्या संगीतमय हनुमान चालीसा ने झाली. पुस्तकाचे विमोचन पुणे पोलीस सहआयुक्त रंजनकुमारजी शर्मा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरधर काळे हे होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात आदर्श माता पुरस्कार सौ निर्मलादेवी द्वारकादाजी माहेश्वरी व लता प्रकाश पोफळे यांना प्रदान करण्यात आला. माहेश्वरी खेलरत्न पुरस्कार झिल संदेश मालाणी, माहेश्वरी विद्यारत्न पुरस्कार ईशान अनिल करवा, विशेष प्राविण्य पुरस्कार पुष्करणी संदीप भट्टड, सार्थक रमेश बिदादा व जतीन सोमाणी यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ जिल्हा सभेचे अध्यक्ष महेश सोमाणी, सचिव सतीश बजाज, युवा समितीचे अध्यक्ष सागर लोया, सचिव रोनक झंवर, महिला समितीचे अध्यक्ष सिमाजी बंग, तसेच जिल्हा सभेचे सल्लागार संजयजी बिहाणी, संजयजी चांडक, दिलीपजी धूत, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटन चे सांस्कृतिक मंत्री कृष्णाजी राठी हे सर्व ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाला संपूर्ण पुण्यातील माहेश्वरी समाज उपस्थित होता. या कार्यक्रमात महेश वंदना तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जाजू यांनी केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed