Manjari Pune Crime News | पुणे: मसाज घेतल्यानंतर चोरी झाल्याचे सांगून ‘स्पा सेंटर’ची केली तोडफोड; मांजरीमधील घटना

Pune Crime News | Chatushrungi police raid spa operating prostitution business under the guise of massage; Spa owner arrested, three young women rescued

पुणे : Manjari Pune Crime News | स्पा मध्ये येऊन त्याने आयुर्वेदिक मसाज घेतला़ त्यानंतर खिशातील पैसे चोरीला गेलेल्याचे म्हणत साथीदारांना बोलावून घेऊन स्पाची तोडफोड केल्याचा प्रकार मांजरीमध्ये घडला.

याबाबत विनोद रावसाहेब लोंढे (वय ३४, रा. राजतारा कॉम्प्लेक्स, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पप्या कांबळे व त्यांच्या ४ ते ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरी येथील राजतारा कॉम्प्लेक्समधील लक्झरी स्पामध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्झरी स्पा मध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. पप्या कांबळे हा शुक्रवारी सायंकाळी स्पा सेंटरमध्ये ग्राहक म्हणून आला. त्याने आयुर्वेदिक मसाज घेतला. त्यानंतर त्याने त्याच्या खिशातील २७ हजार रुपये कोणीतरी काढून घेतले असे म्हणून आरडाओरडा करीत फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यांनी त्याची समजूत काढीत असताना त्याने फोन करुन साथीदारांना बोलावले.

त्याचे ४ ते ५ साथीदार हातात कोयते घेऊन आले. त्यांनी फिर्यादीना हाताने मारहाण केली. स्पामधील काऊंटरवरील कॉम्प्युटर, समोरील काच, साईन बोर्ड याची तोडफोड करुन नुकसान केले.
स्पाचे बाहेर येऊन निघून जात असताना आजू बाजूच्या दुकानदार यांच्याकडे पहात जर तुम्ही
यांना मदतीला आला किंवा पोलिसांना कळविले तर तुमचे पण काही खरे नाही,
असे म्हणत हातातील कोयते हवेत फिरवत आरडाओरडा करुन दहशत पसरविली.
सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत. (Manjari Pune Crime News)

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed