MLA Rohit Pawar | अजितदादांच्या निधनाला एक महिना पूर्ण; रोहित पवारांनी शेअर केला भावनिक WhatsApp स्क्रीनशॉट
मुंबई : MLA Rohit Pawar | महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्यानंतर आता एक महिना पूर्ण झाला आहे. त्यांच्या जाण्याने राज्यभरात शोककळा पसरली होती, तर त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांच्या मनात अजूनही अपघाताचा धक्का आहे.
या पार्श्वभूमीवर, अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अजित पवार यांच्यासोबतचे व्हॉट्सअप कॉलचा स्क्रीनशॉट पोस्ट करत रोहित पवार यांना भावना अनावर झाल्या. रोहित पवार यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला. त्यामध्ये अजित पवार यांच्यासोबत झालेल्या व्हॉट्सअॅप कॉलची हिस्ट्री दिसत आहे.
खूप वेदनादायी..! म्हणत रोहित पवार म्हणतात… “जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही”, असं रोहित पवार म्हणाले.
