Bank Holiday In March | मार्च महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार? जाणून घ्या

Bank Holiday In June | Banks will remain closed for 11 days in June; Know the complete schedule of holidays before going to the bank


मुंबई  : Bank Holiday In March | मार्च 2026 महिन्यात विविध सण, सार्वजनिक सुट्ट्या आणि नियमित आठवड्याच्या सुट्ट्यांमुळे देशभरातील बँकांचे कामकाज अनेक दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जाऊन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनी आधीच सुट्ट्यांची यादी तपासून नियोजन करणे आवश्यक आहे.

मार्चमध्ये होळी, धुलिवंदन, गुढीपाडवा, रमजान ईद, राम नवमी असे सण आहेत. त्यामुळे या दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक महत्त्वानुसार सुट्टया असणार आहेत. मार्च महिन्याची सुरुवातच होळीच्या सुट्ट्यांनी होत आहे. 3 मार्च रोजी होळी/धुलिवंदनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. काही राज्यांत 4 मार्चलाही होळीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल. त्यानंतर 19 मार्च रोजी गुढीपाडवा, पुढे तसेच 21 मार्च रोजी रमजान ईदनिमित्त बँका बंद राहतील. 26 मार्च रोजी बँकांना रामनवमीची सुट्टी राहणार आहे.

म्हणजेच मार्च महिन्यात 1, 8, 15, 22 आणि 29 तारखेला मिळून एकूण 5 रविवार येत आहेत. त्यामुळे या तारखांना बँकांना सुट्टी असेल. त्याबरोबरच 14 आणि 28 मार्च रोजी दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. याशिवाय प्रत्येक रविवारी बँका बंद असतातच, तसेच दुसरा आणि चौथा शनिवारही नियमित सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळे संपूर्ण महिन्यात मिळून सुमारे १० ते १२ दिवस बँक शाखांचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे. मात्र या सुट्ट्या सर्व राज्यांत एकसारख्या नसतात; त्या संबंधित राज्यातील सण आणि स्थानिक निर्णयांवर अवलंबून असतात.