Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!
डोंबिवली : Mumbai Police Constable Wife Suicide | कल्याणमधील (Kalyan Crime News) आडीवली-ढोकळी भागात नवविवाहित तरुणीने आत्महत्या (Newly Married Woman Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जागृती सागर बारी (वय 24) हिने पती आणि सासूच्या रोजच्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी जागृतीने मोबाईलमध्ये सुसाईड नोट (Suicide Note) लिहून यासाठी सासू आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पतीला जबाबदार धरलं आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) पती सागर रामलाल बारी Sagar Ramlal Bari (वय 32) सासू शोभा रामलाल बारी यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. दरम्यान 11 जुलैपर्यंत या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सागर हा मुंबईच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात (Azad Nagar Police Station) पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे, असे मानपाडा पोलिसांनी सांगितले.
मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाखांची मागणी
तुझे काळे ओठ आहेत, तुझ्या तोंडाचा घाण वास येतो, पती आणि सासूच्या रोजच्या टोमन्याने जागृतीने टोकाचे पाऊल उचलत लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यानंतर आपली जीवन यात्रा संपवली. भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील गजानन भिका वराडे यांनी आपली मुलगी जागृतीचा विवाह जळगाव जिल्ह्यातील पिंप्राळामधील सागर बारी सोबत दोन महिन्यापूर्वी 20 एप्रिल 2024 रोजी लावून दिले. लग्नात सागरला 14 ग्रॅमची सोन्याची चेन, 6 ग्रॅमची सोन्याची अंगठी दिली. सागर हा मुंबई पोलीस दलात असल्याने विवाहानंतर 21 जूनला कल्याण मधील आडीवली ढोकळी परिसरात पतीसह राहायला जाणार असल्याने तिचे आई-वडिल तिला भेटायला गेले. त्यावेळी सासू शोभा हिने हुंडा दिला नाही, अशी तक्रार केली होती. तसेच मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप वराडे कुटुंबाने केला आहे.
सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या
सध्या शेतीमध्ये पैसा लागलेला आहे, त्यामुळे पैसे नाही. मी तुम्हाला थोडीफार रक्कम देईन, असं वरडे यांनी सांगितले. त्यानंतर मुलगी मुंबईत राहायला गेली. यानंतर 5 जुलैला जागृतीचा पती सागर याने तिचा भाऊ विशाल याला फोन केला. तुझ्या बहिणीने घरातील बेडरुममधील सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे सागरने सांगितले आणि फोन कट केला. यानंतर जागृतीचे कुटुंबीय व नातेवाईक कल्याणमध्ये आले. त्यानंतर जागृतीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी सागर आणि त्याच्या आईवर गुन्हा दाखल करुन अटक केली. (Hanging Case)
आईसोबत शेवटचं बोलणं
जागृतीच्या आईने तिच्यासोबत शेवटचं काय बोलणं झालं ते सांगितलं. आई माझी सासू मला तू काळी आहेस तुझे ओठ काळे आहेत, तोंडाचा घाण वास येतो असे हिणवुन तू माझ्या मुलाला पसंत नाही. घरातून निघून जा. नाहीतर आईकडून घर घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन ये. माझा शारीरिक आणि मानसिक छळ करते, तू त्यांच्याशी बोलून घे, असं जागृतीने फोनवर सांगितल्याचे तिच्या आईने सांगितले.
जागृतीचा पती मुंबई पोलिसांमध्ये कार्यरत आहे. सागर आईसोबत कल्याण मधील आडीवली ढोकळी भागात एकविरा आई अपार्टमेंटमध्ये राहत आहे. डोंबिवलीमध्ये आल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्ये जागृतीने 5 जुलैला टोकाचं पाऊल उचललं, त्याआधी तिने मोबाईलमध्ये नोट लिहिली. (Mumbai Police Constable Wife Suicide)
पोलिसांकडून मोबाईल जप्त
मोबाईल लॉक असल्याने सागरला मोबाईल ओपन करता आला नाही.
यानंतर पोलिसांनी जागृतीचा मोबाईल ताब्यात घेतला.
तिच्या बहिणीने लॉक पॅटर्न सांगितल्यानंतर पोलिसांना सुसाईड नोट सापडली.
ज्यामध्ये तिने सासू आणि पतीला जबाबदार धरलं आहे. या आधारे मानपाडा पोलिसांनी पती आणि सासूवर गुन्हा दाखल केला.
सासू गहू घेण्यासाठी बाहेर गेली तेव्हा तिने बाहेरुन घराला कुलूप लावलं,
यानंतर जागृती 200 लिटर पाण्याच्या ड्रमची मदत घेऊन फॅनखाली उभी राहिली आणि ओढणीच्या सह्याने गळफास लावून घेतला.
मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिच्या सासू आणि पतीवर कठोर कारवाई व्हावी,
त्यांना शिक्षा मिळाली तर माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी मागणी जागृतीच्या आईने केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक
Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…