Mundhwa Pune Crime News | दांडिया खेळण्याच्या वादात भांडणे सोडण्यास गेलेल्यावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

marhan

पुणे : Mundhwa Pune Crime News | दांडिया खेळण्याच्या वादात भांडणे सोडविण्यास गेलेल्यावर टोळक्याने धारदार हत्याराने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) आठ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DA7mV1zJcoU

ईश्वर दांडेली (वय ४२, रा. तारादत्त कॉलनी, घोरपडी), मारुती गवंडी (वय ५८, रा. बी टी कवडे रोड, घोरपडी), ऋषिकेश दांडेली (वय २०, रा. तारादत्त कॉलनी, घोरपडी), निखिल गवंडी (वय ३२), संतोष दांडेली (वय ४०), जावेद शेख (वय २३), अनिकेत अनगल (वय २५, सर्व रा. बी़ टी़ कवडे रोड, घोरपडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना बी. टी. कवडे रोडवरील शिव मित्र मंडळात मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.

https://www.instagram.com/p/DA7phM_C0_T

यामध्ये आनंद देवेंद्र मांगले (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची पत्नी शितल आनंद मांगले (वय ४३, रा. पवार इंटरप्रायझेस, बी टी कवडे रोड, घोरपडी) यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

https://www.instagram.com/p/DA6QYovCHMZ

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती दांडिया खेळण्यासाठी शिवमित्र मंडळ येथे गेले होते. यावेळी दांडिया खेळण्याच्या वादातून राजवर्धन नुगला यास मारुती गवंडी हा मारहाण करीत होता. ही भांडणे सोडविण्यासाठी आनंद मांगले गेले. तेव्हा आरोपींनी पूर्वीचा राग मनात धरुन फिर्यादीचे पती आनंद मांगले यांना मारहाण केली. ईश्वर दांडेली यांनी धारदार शस्त्राने आनंद यांच्या मानेच्या डाव्या बाजूला वार करुन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक टापरे तपास करीत आहेत. (Mundhwa Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DA6I39UiXWg

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed