Mundhwa Pune Crime News | मुंढवा: केशवनगरमध्ये फायरिंग ! ज्येष्ठ नागरिकासह दोघे ताब्यात

pistol

पुणे : Mundhwa Pune Crime News | केशवनगरमधील कोणार्क सोसायटीजवळ (Konark Society Keshav Nagar) फायरिंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात एअरगनमधून फायरिंग (Firing In Keshav Nagar Mundhwa) करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केशवनगर येथील रेणुका माता मंदिराच्या बाजूला असलेल्या कोणार्क सोसायटीत फायरिंगचा आवाज आला. नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्याबरोबर मुंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माळी आणि केशवनगर बीट मार्शल घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाहणी केल्यानंतर एअरगनचे तीन छरेरे मिळून आले. आजूबाजूच्या परिसराचा शोध घेतला असता समोरुन एका अपार्टमेंटमधून एअरगनच्या साह्याने ते फायरिंग केल्याचे आढळून आले. पोलिसांनी एअरगन आणि एअरगन वापरणारे यांना ताब्यात घेऊन मुंढवा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाले असून चौकशी केली जात आहे.

याबाबत मुंढवा पोलीस ठाण्याचे (Mundhwa Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप (Sr PI PI Nilkanth Jagtap) यांनी सांगितले की, टाटा स्टिलमधुन निवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक आपल्या पत्नीसह तेथे राहतात.
त्यांनी नुकतीच १७ ऑगस्ट रोजी नविन एअरगन घेतली आहे.
या गनची प्रॅक्टिस करीत असताना अनावधानाने खिडकीच्या बाजूला फायर झाल्याने छरेरे खिडकीतून बाहेर गेले.
त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”,
शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या