Nana Patole On Mahayuti | ‘महायुतीमध्ये मोठी गडबड, फडणवीसांनी हात वर केलेत’; नाना पटोलेंचे वक्तव्य म्हणाले – “आम्ही वाट पाहतोय…”
मुंबई : Nana Patole On Mahayuti | आज जळगाव जिल्ह्यात पंतप्रधानांची हजेरी आहे. नेपाळमधील दुर्घटनेत जळगावच्या नागरिकांचा मृत्यू झालेला असताना थोडीशी तरी माणुसकी असती तर भाजपने आणि पंतप्रधानांनी हा कार्यक्रम रद्द केला असता असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहत असून महायुतीमध्ये महाभारत चालला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हात वर केलाय. महायुतीमध्ये मोठी गडबड सुरू आहे. पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता असल्याचं भाकित पटोले यांनी केले आहे.
नाना पटोले म्हणाले, “महायुतीमध्ये महाभारत चालला आहे. फडणवीस यांनी हात वर केलाय. महायुतीमध्ये मोठी गडबड सुरू आहे. पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोर्टाच्या निकालाची आम्ही वाट पाहतोय. या निकालाकडून फार अपेक्षा आहेत.”
नेपाळमध्ये तीर्थक्षेत्रासाठी गेलेल्या जळगाव (Jalgaon News) मधील नागरिकांच्या मृत्यूनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बोट ठेवले. ते म्हणाले, थोडीशी भावना, थोडीशी तरी माणुसकी असती तर भाजपने आणि पंतप्रधानांनी हा कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि एकीकडे ते उत्साह साजरा करत आहेत.
सर्वात संवेदनहीन प्रधानमंत्री या देशाने पाहिला आहे. हा कार्यक्रम जनतेच्या पैशाने होतोय. शासकीय कार्यक्रम आहे.
एकीकडे महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि दुसरीकडे त्यांच्याच पैशाने कार्यक्रम घेऊन मीठ चोळत आहेत का?
असा सवाल नाना पटोले यांनी केला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय